viral video: वांग्याची भाजी खाताय? वेळीच सावध व्हा नाहीतर जीवावर बेतेल

चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील गणेशपिपरी गावात वांगे समजून धोतरा फळाची भाजी खाल्ल्याने अख्ख कुटुंब रुग्णालयात पोचले. कुटुंबातील पाच व्यक्तींची प्रकृती बिघडली आहे.

Updated: Nov 5, 2022, 01:24 PM IST
viral video: वांग्याची भाजी खाताय? वेळीच सावध व्हा नाहीतर जीवावर बेतेल  title=

आशीष अम्बाडे, झी मीडिया, चंद्रपूर: हल्ली आपण काय खातो आणि काय नाही यावर वेळीच लक्ष ठेवणे गरजेचे आहे. कारण जर आपण असं करत नसू तर ती खाल्यावर आपल्याला भीषण आजारांना सामोरे जावे लागते. त्यातून जर भाज्या समजून चुकीचं फळं (Fruits) खाल्लं तर ते आपल्या जीवावरही बेतू शकतं. सध्या चंद्रपूरमध्ये (Chadrapur) असाच एक प्रकार घडला आहे. वांगी (Baingan) समजून या कुटुंबानं धोतराच्या फळाची भाजी खाल्ली आणि खाऊन ते सगळेच आजारी पडले आणि ते सगळे रूग्णालयात भरती झाले. (family get admitted in hospital after eating dhotra fruit assuming baigan vegetable)

चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील गणेशपिपरी गावात वांगे समजून धोतरा (Dotara) फळाची भाजी खाल्ल्याने अख्ख कुटुंब रुग्णालयात पोचले. कुटुंबातील पाच व्यक्तींची प्रकृती बिघडली आहे. उपचारासाठी सर्वांना गोंडपिपरी ग्रामिण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील काहींना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. किसन खांडरे, रेखा तुळशिराम खांडरे,कमला नेवारे,सिताबाई किसन खांडरे, रिया सरवर अशी रुग्णालयात दाखल असलेल्यांची नावे आहेत. 

viral video: आईवडिलांनी मुलीसाठी पुढे केली संरक्षणाची ढाल... बदनामी केल्यानं जावयाची अब्रु वेशीवर!

काय घडला आहे प्रकार: 

गोंडपिपरी तालुक्यातील गणेशपिपरी ग्रामपंचायत कार्यालयालगतच्या परिसरात धोतराचे झाडाला लागलेले फळ हुबेहूब वांग्यासारखे दिसले. गावातील खंडारे कुटुंबातील महिलांनी ही फळभाजी तोडून भाजी करत जेवण केले.यानंतर त्यांना त्रास जाणवू लागला.पोटात मळमळ आणि उलटी (Vomiting) सुरू झाली. ही विषारी धोतऱ्याची भाजी असल्याचे समजताच पाचही व्यक्तींना उपचारासाठी गोंडपिपरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या सर्वांवर होणाऱ्या उपचारावर (Treatment) देखरेख केली जात आहे.

मित्रानेच केला घात! जिगरी दोस्ताचा अश्लील व्हिडीओ बनवत त्याने... पुण्यातील घटना!

वेळीच घ्या काळजी : 

अशाप्रकारे अनेक प्रकार आपल्या आजूबाजूला घडत असतात. तेव्हा आपल्याला आपल्या आरोग्याची (Health Problems) काळजी घेण्यासाठी फारच महत्त्वाचं ठरलं आहे. त्यामुळे वांगी आणि धोतऱ्याचा फरक तुम्हाला ओळखणं फारच महत्त्वाचं आहे. तेव्हा यापुढे कुठलीही भाजी घेताना आपल्याला ही काळजी घेणं बंधनकारक आहे.