मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांचं सत्र सुरुच

मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांचं सत्र सुरूच आहे. २०१८च्या पहिल्या ७८ दिवसांत २०२  शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. विभागीय आयुक्तांकडे यासंदर्भात नोंद करण्यात आलीय. 

Surendra Gangan Updated: Mar 23, 2018, 08:31 PM IST
मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांचं सत्र सुरुच   title=

औरंगाबाद : मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांचं सत्र सुरूच आहे. २०१८च्या पहिल्या ७८ दिवसांत २०२  शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. विभागीय आयुक्तांकडे यासंदर्भात नोंद करण्यात आलीय. 

शेतकरी निराशेच्या गर्तेत 

कर्ज माफीला झालेला उशीर, कापसाला बसलेला बोंड अळीचा फटका, अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहेत. त्यामुळे मराठवाड्यातला शेतकरी निराशेच्या गर्तेत गेल्याचं या आकडेवारीतून स्पष्ट झालंय.

गेल्यावर्षी  ९९१ आत्महत्या  

गेल्यावर्षी सुद्धा मराठवाड्यात ९९१ आत्महत्या झाल्या होत्या. त्यामुळे यंदाही मराठवाड्याला शेतक-यांच्या आत्महत्यांनी ग्रासल्याचं स्पष्ट झालंय. मात्र यामुळे आत्महत्या रोखण्यासाठी सरकार पुरेसं काम करतंय का असा प्रश्न निर्माण होतोय.