शेतक-यांची सगळी तूर खरेदी करणार - सुधीर मुनगंटीवार

शासनाच्या त्या पत्रामुळे कदाचित गोंधळ झाला असावा मात्र शेतकऱ्यांकडून सगळी तूर खरेदी केल्या जाईल, असे स्पष्टीकरण राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. ते औरंगाबाद येथे बोलत होते. 

Amit Ingole Amit Ingole | Updated: Feb 5, 2018, 07:34 PM IST
शेतक-यांची सगळी तूर खरेदी करणार - सुधीर मुनगंटीवार title=

औरंगाबाद : शासनाच्या त्या पत्रामुळे कदाचित गोंधळ झाला असावा मात्र शेतकऱ्यांकडून सगळी तूर खरेदी केल्या जाईल, असे स्पष्टीकरण राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. ते औरंगाबाद येथे बोलत होते. 

गौताळा अभयारण्याबाबत चौकशी करू

तसेच, गौताळा अभयारण्यात जर नियम तोडून काम होत असेल तर त्याची चौकशी केल्या जाईल, इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये सुद्धा काम होतात मात्र त्याचे वेगळे नियम असतात, मात्र गौताळा प्रकरणाची चौकशी चे आदेश देतोय, सत्य समोर येईल, असेही सुधीर मुनगंटीवार म्हणाले. 

तूर खरेदीबाबत फतवा

तूर खरेदीचा गोंधळ संपता संपत नाहीये. आधी तूर खरेदी केंद्र सुरु कधी होणार हा गोंधळ तर आता शेतक-यांकडून प्रति एकर फक्त २ क्विंटल तूर खरेदी करणारा नवा फतवा आलाय. त्यामुळे शेतकरी हैराण झाला आहे. 

इतक्याच तूरीला हमीभाव

शासन नियमानुसार औरंगाबादेत एकरी २ क्विंटल तूरच शासनाच्या तूर खरेदी केंद्रावर हमी भावात विकत घेतल्या जाणार आहे. एका एकरमध्ये जवळपास ८ ते १० क्विंटल तूर उत्पादन होतं. मात्र शासन २ क्विंटलच खरेदी करणार असल्यानं शेतकरी पुन्हा हवालदिल झाला. उरलेल्या तूरीचं काय करावं असा प्रश्न शेतक-यांना पडलाय.