नवी मुंबई : भाजप नेते आणि आमदार गणेश नाईक ( BJP MLA Ganesh Naik) यांच्यावर जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीबीडी पोलीस ठाण्यात पीडीत महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल झाला आहे. नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आमदार नाईक अडचणीत सापडले आहे. (Navi Mumbai Municipal Election)
गेली 27 वर्ष गणेश नाईक यांच्याबरोबर आपले लिव्ह ॲन्ड रिलेशनमध्ये संबंध असल्याचा दावा, या पीडीत महिलेना दावा केला आहे. लिव्ह ॲड रिलेशनमधून झालेल्या मुलाला गणेश नाईक यांनी स्वीकारण्यास नकार दिला आहे. तसेच आपल्याला जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा या महिलेचा आरोप आहे.
2021 मध्ये गणेश नाईक यांनी सीबीडी येथील आपल्या कार्यालयामध्ये मला बोलावले होते. त्यावेळी त्यांनी डोक्यावर बंदूक ठेवून जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती, अशी तक्रार या महिलेने दिली आहे. या महिलेने नेरुळ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.
याआधीही आपण तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, माझी तक्रार दाखल करुन घेतली गेली नाही, असा आरोपही तिने केला आहे. आता पीडित महिलेने महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. या प्रकरणाची चौकशी करुन योग्य ती कारवाई करावी, अशी सूचना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिले आहे.
तसेच गणेश नाईक यांची डीएनए चाचणी करावी, अशी मागणीच शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी केली आहे.