पुणे : माहिती अधिकारात दोनपेक्षा अधिक वेळा अर्ज केल्यास संबंधित अर्जदाराच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करा, असा फतवा महावितरणच्या पुणे विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी काढला आहे. एम. जी शिंदे या अधिका-याने हा तुघलकी फतवा काढलाय.
महावितरणच्या पुणे परिमंडळासाठी त्यांनी हा आदेश १५ मार्च रोजी काढलाय. शिंदे यांच्या या पारदर्शी कारभाराच्या नमुन्यामुळं आरटीआय कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडालीय. हा आदेश किंवा परिपत्रक मागे घ्यावं अशी मागणी आरटीआय कार्यकर्त्यांनी केली आहे. नाहीतर आरटीआय कार्यकर्ते सामूहिकरित्या दोनच नाही तर दहा-दहा अर्ज माहिती अधिकारात करून या आदेशाचा उल्लंघन करतील असा इशारा देण्यात आलाय.