नवी मुंबई : नवी मुंबईत ऐरोलीत पहाटे साडे तीन वाजता लागलेल्या आगीच्या धुरात गुदमरून मायलेकीचा मृत्यू झालाय. पाच वर्षाची गायत्री चौधरी आणि तिची आई मंजू चौधरी या दोघीही आग लागल्यावर घराबाहेर पडू शकल्या नाहीत.
आग लागल्यावर गायत्रीचे वडील दोन वर्षाच्या मुलाला घेऊन घराबाहेर पडले. पण पत्नी आणि मुलीला बाहेर काढण्यासाठी पुन्हा आत जाऊ शकले नाहीत. ऐरोलीतल्या सेक्टर तीनमध्ये खाली दुकान आणि पोटमाळ्यावर चौधरी कुटुंब राहत होतं.
प्राथमिक तपासणीनुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचं पुढे आलंय. दुकानात प्लास्टिकच्या वस्तू असल्यानं आग आणि धुर वाढत गेल्याचंही समोर आलं आहे.