Maharashtra 1st Underground Metro In Pune : महाराष्ट्रातील पहिली Underground Metro पुण्यात सुरु झाली आहे. मुंबईच्या आधी पुणेकरांचा भुयारी मेट्रोतून प्रवास केला आहे. पुणे मेट्रो भुयारी मार्ग प्रवासाचा व्हिडिओ एका प्रवाशाने सोशल मिडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. मुंबईसह पुण्यातही भुयारी मेट्रोचे काम सुरु होतो. अखेरीस महाराष्ट्रातील पहिला भुयारी मेट्रो मार्ग पुण्यात सुरु झाला आहे. पुणेकरांचा या नव्या मेट्रो सेवेला भरघोस प्रतिसाद मिळत आहे.
पुणे मेट्रो 2 विस्तारित मार्गांचं 1 ऑगस्ट 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण झाले. बुधवारी संध्याकाळपर्यंत सुमारे 21 हजार प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केला.आता पुणेकरांना वनाज ते रुबी हॉल क्लिनिक स्टेशन आणि पिंपरी ते दिवाणी न्यायालय स्टेशन असा प्रवास करणं शक्य झालंय.
@Puneri Speaks या नावाच्या ट्विटर हँडलवरुन पुणे मेट्रो भुयारी मार्ग प्रवासाचा व्हिडिओ शेअर केला आहे. हजारो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. या व्हिडिओच्या माध्यामातून प्रत्यक्षात पुण्याचा भुयारी मेट्रो रेल्वे मार्ग कसा आहे हे पहायला मिळत आहे. वनाज ते रुबी हॉल क्लिनिक स्टेशन आणि पिंपरी ते दिवाणी न्यायालय स्टेशन असा हा पुणे मेट्रो 2 चा विस्तारित मार्ग आहे. पुण्यात सध्या दोन भूमीअंतर्गत स्थानके प्रवाशासाठी सुरु झाली आहेत. शिवाजीनगर स्थानक आणि सिव्हिल कोर्ट ही दोन स्थानक भुयारी मार्गावर आहेत. . मेट्रोच्या भूमीअंतर्गत मार्गावर पंखे लावण्यात आल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे. भुयारी मार्गात मेट्रो बंद पडल्यास प्रवाशांना त्रास होवू नये तसेच भुयारी मार्गात हवा खेळती रहावी यासाठी हे पंखे लावण्यात आल्याचे समजते. या भुयारी मार्गात ट्रॅकची क्रॉसिंगसुद्धा असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. पुणेकरांचा भुयारी मेट्रोचा प्रवास हा सर्व सोईसुविदांनी सुसज्ज असा आहे.
पुणे मेट्रो भुयारी मार्ग प्रवास pic.twitter.com/K7ITrU7mOm
— पुणेरी स्पिक्स™ Puneri Speaks (@PuneriSpeaks) August 1, 2023
मुंबईतील कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो 3 हा भुयारी रेल्वे मार्ग आहे. या मेट्रो मार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. लवकरच या भुयारी मेट्रो मार्ग मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. या मेट्रोमुळे मुंबईकरांचा प्रवास अधिक जलद आणि सुखकर होणार आहे.