सावध व्हा! कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचे आणखी ५ रुग्ण

चिंता वाढवणारं वृत्त समोर आलं आहे

Updated: Apr 9, 2020, 01:37 PM IST
सावध व्हा! कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचे आणखी ५ रुग्ण  title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : कोरोना विषाणू coronvirus चा संसर्ग राज्यात दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना रुण्यांची झपाट्याने होणारी वाढ ही प्रशासनाच्याही चिंतेचा विषय ठरत आहेत. त्यातच आता कल्याण - डोंबिलवी भागातून आता चिंता वाढवणारं वृत्त समोर आलं आहे. या भागात आणखी ५ कोरोनाग्रस्त रुग्णांची नव्याने भर पडली आहे. 

नव्या रुग्णांचा आकडा पाहता आता कल्याण- डोंबिवलीत कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या ४३ च्याही वर गेली आहे. गुरुवारी या भागात आढळलेल्या पाचही रुग्ण या महिला असल्याचं स्पष्ट झालं आहे. यामध्ये डोंबिवली पूर्व येथील २, डोंबिवली पश्चिमेतील  १ आणि कल्याण पूर्व येथील २ महिलांना कोरोनाची लागण झाली आहे.

कोरोना रुग्णांचा वाढणारा हा आकडा पाहता आता कल्याण- डोंबिवली भागात लॉकडाऊनचे नियम आणखी कडक केले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, कोरोनाने धोक्याची पातळी गाठलेली असली तरीही प्रशासनाच्या सूचनांकडे काही नागरिक मात्र सातत्याने दुर्लक्ष करत आहेत. 

 

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी या भागात प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मेडिकल आणि क्लिनिक वगळता अन्य जीवनावश्यक वस्तूंची दुकानंही १२ तासच उपलब्ध होणार आहेत. सकाळी पाच ते संध्याकाळी पाच या वेळेतच नागरिकांना जीवनावश्यक वस्तू खरेदी करता येणार आहेत. संध्याकाळी पाचनंतर हे सर्व व्यवहार बंद करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत.  डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत.