बुलढाणा : अचानक परतलेल्या वरुणराजाने सर्वांना आनंदाची भरी घातलेली दिसत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात पाउस परतल्याने बळीराजा सुद्धा सुखावला आहे. त्यातच निसर्गाने बुलडाण्यात एक छान धुक्याची चादर पसरवल्याने बुलडानेकरांना जणू आनंदांतच भिजवून टाकलंय. काल रात्रीपासून बुलडाण्यात चोहीकडे धुकेच धुके पसरलं होतं.
धुक्याची ही चादर शहरावर आजही कायम आहे.. या आल्हाददायक वातावरणामुळे शहरातील कारंजा चौक, जयस्तंभ चौकात गर्दी झाली होती. प्रसिद्ध राजूर घाटही प्रर्यटकांनी गजबजून गेलं. बुलढाणा सारख्या जिल्ह्यात धुके दिसू लागल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे, कारण उन्हाळ्यात बुलढाणा जिल्ह्याचं तापमान प्रचंड असतं.