माझ्यावर मोक्का लावण्यात एकनाथ खडसे यांचा हात; गिरीश महाजन यांचा गंभीर आरोप

गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्यावर अत्यंत गभीर आरोप केला आहे. तसेच महाजन यांनी खडसेंवर घणाघाती टीका देखील केली आहे.

Updated: Nov 20, 2022, 11:35 PM IST
माझ्यावर मोक्का लावण्यात एकनाथ खडसे यांचा हात; गिरीश महाजन यांचा गंभीर आरोप title=

सागर आव्हाड, झी मीडिया, जळगाव : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि बाजप नेते गिरीश महाजन(Girish Mahajan) यांच्यात पुन्हा एकदा कलगीतुरा रंगला आहे. गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्यावर अत्यंत गभीर आरोप केला आहे. तसेच महाजन यांनी खडसेंवर घणाघाती टीका देखील केली आहे(Maharashtra Politics).

सरकारमध्ये असताना लोक  कटकारस्थान करतात. माझ्यावर मोक्का लावण्यात एकनाथ खडसे यांचाच होता असा गंभीर आरोप महाजन यांनी केला.  माझ्याविरोधात मोठं कटकारस्थान रचले जात आहे. काही दिवसांत ऑडिओ क्लीप्स आणणार असल्याचा इशारा देखील महाजन यांनी दिला आहे. 

खडसे काय बोलतात, त्यांनाही समजत नाही. एकनाथ खडसेंना हॉस्पिटलला भरती करण्याची गरज असल्याचा खोचक टोला देखील महाजन यांनी यावेळी लगावला.  एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन हे दोघ एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत.