११ गावे पुणे महापालिकेत समाविष्ट करण्याचा सरकारचा निर्णय

 पुणे महापालिका हद्दीलगतची ११ गावे महापालिकेत समाविष्ट करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासंदर्भात दाखल याचिकेच्या सुनावणी दरम्यान सरकारकडून न्यायालयाला ही माहीती सादर करण्यात आली. महापालिका हद्दीला लागून असलेली ३४ गावे महापालिकेत समाविष्ट करण्याची अनेक वर्षांची मागणी आहे. त्या ३४ पैकी ११ गावांचा डिंसेबर २०१७ पर्यंत महापालिकेत समावेश करणार असल्याचं सरकारनं म्हटलं आहे.

Updated: Jul 19, 2017, 03:57 PM IST
११ गावे पुणे महापालिकेत समाविष्ट करण्याचा सरकारचा निर्णय

पुणे : पुणे महापालिका हद्दीलगतची ११ गावे महापालिकेत समाविष्ट करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासंदर्भात दाखल याचिकेच्या सुनावणी दरम्यान सरकारकडून न्यायालयाला ही माहीती सादर करण्यात आली. महापालिका हद्दीला लागून असलेली ३४ गावे महापालिकेत समाविष्ट करण्याची अनेक वर्षांची मागणी आहे. त्या ३४ पैकी ११ गावांचा डिंसेबर २०१७ पर्यंत महापालिकेत समावेश करणार असल्याचं सरकारनं म्हटलं आहे.

उर्वरित गावं टप्या ट्प्यानं मागापालिकेत घेणार असल्याचही सांगण्यात आलं आहे. ही गाव महापलिकेत घेण्यावरून वाद होता. ही गावं महापालिकेत आल्यास त्यांचा खर्च झेपणार नसल्याचं काही नेत्यांचं मत होतं, तर काही त्याबाबत आग्रही होते. अलिकडेच झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीदरमान यातील १४ गावांनी निवडणुकीवर बहिष्कार देखील घातला होता. या सगळ्या पार्श्वभूमिवर ग्रामस्थांच्या लढ्याला अंशता यश आल्याचं म्हणावं लागेल. पुण्यातील बहुचर्चित कचरा डेपो ज्या ठिकाणी आहे ती उरुळी देवाची तसेच फुरसुंगी ही दोन्ही गावं महापालिकेत समाविष्ट करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे यापुर्वी अंशतः समाविष्ट करण्यात आलेली ९ गावं पूर्णत: महापालिकेत येणार आहेत.