Maharashtra Rain Update : हवामान खात्याकडून अनेक जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईला हवामान खात्याने 24 तासांचा अलर्ट दिला आहे. पालघर, ठाण्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासाठी रेड अलर्ट दिलाय..तर कोल्हापूर, साताऱ्यातही मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भात भंडारा, चंद्रपूर गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यात मुसळधार पावसाची दाट शक्यता वर्तवली असून याठिकाणीही रेड अलर्ट देण्यात आला आहे.
पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांसाठी स्थानिक अंदाज. शहर आणि उपनगरात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 31°C आणि 26°C च्या आसपास असेल. कोंकणातील जिल्ह्यांमध्ये भागातील तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट भागातील तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास वेग) आणि हल्का ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट भागातील तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.