लैलेश बारगजे, झी मिडिया, अहमदनगर : देशभरात हनुमानाचे लाखो भक्त आहेत. महाराष्ट्रात एक असे जाव जिथे हनुमानाची पूजा करत नाहीत. इतकचं काय तर ‘मारूती’ची नावाची गाडीही कुणी घेत नाही. अहमदनगरमधील पाथर्डी तालुक्यातील दैत्यनांदूर गाव असं आहे. जिथं हनुमानाच मंदिर नाही तर दैत्यमहाराजांचे मंदिर असून वर्षभर दैत्यांची पूजा अर्चा करून मनोभावे भक्ती गावकऱ्यांकडून होते.
पोथी पुराना उल्लेख असल्याप्रमाणे, निंबादैत्य व हनुमंत दोघांत घनघोर असे गदा युद्ध होते. त्यात दोघही जखमी होतात. निंबादैत्य प्रभुरामाचा धावा करतो. त्यामुळे हनुमंत आश्चर्यचकीत होतो. प्रभूराम येतात आणि निंबादैत्याला बरे करतात आणि वर देतात. या गावात तुझेच नाव निघेल. तुझे मंदिरही बांधले जाईल.रामाने वर दिल्यानंतर निंबादैत्य सांगतात, तुम्ही तर हनुमंताला प्रत्येक गावात तुझे मंदिर होईल, असे सांगितले आहे. मग हे कसे. त्यावर प्रभू राम म्हणतात, गाव तुझेच. इथे हनुमंताचे मंदिर नसेल आणि त्याच्या नावाचा उल्लेखही निघणार नाही.
दैत्य नांदूर हे गाव रामायण काळातील ही प्रथा आजही पाळते आहे. इथला भूमिपूत्र अमेरिकेत असला तरी त्याच्या घरात निंबादैत्याचे छायाचित्र असतेच. घर,गाडीवर तर दुकानांची नावे श्री निंबादैत्य या नावाने गावामध्ये आहेत. दैत्य नांदूर गावातील ग्रामस्थांचा मुख्य व्यवसाय हा शेती आहे मात्र शिक्षणाच्या प्रवाहात आल्यामुळे गावातील मोठ्या प्रमाणात नोकर वर्ग आहे हा नोकर वर्ग वेगवेगळ्या शहरांमध्ये वास्तव्य करत आहे व्यवसायाच्या निमित्ताने ही ग्रामस्थ गावाबाहेर पडले आहेत मात्र ते ग्रामस्थ जिथे राहतात तिथे आपल्या गावाची कथा पाळताना पाहायला मिळतात अगदी दुसऱ्या शहरात राहत असले तरी हनुमानाची पूजा करणे टाळतात याबरोबरच गावाकडे निंबादैत्याच्या यात्रा उत्सवाला न चुकता हजेरी लावतात
पडावा आणि पाडव्याचा दुसरा दिवस असे दोन दिवस यात्रा भरवली जाते.पाडव्याचा यात्रेचा मुख्य दिवस असतो. ऑर्केस्ट्रा कुस्त्या,तमाशा, छबिना, गंगेचे पाणी आणलेली कावडी, अभिषेक महाआरती अशी विविध कार्यक्रम पार पडतात. गेली पंधरा वर्षांपासून श्री. निंबादैत्य महाराज देवस्थान सार्वजनिक ट्रस्टची स्थापना केली असून त्यामाध्यमातून विकासाची कामे येथे सुरु आहे.लवकरच मंदिर जिर्णोद्धाराचे काम हाती घेण्यात येणार आहे.पंधरा दिवसातून एकदा दर शनिवारी दैत्य महाराजांची महाआरती होऊन अन्नदानाची महा पंगत गावासाठी व आलेल्या भाविकासांठीचा उपक्रम राबवण्यात येतो.