नागपूर : गेल्या काही दिवपासून नागपुरात दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या. त्यामुळे पोलिस याप्रकरणी तपास करत होते. यावेळी खबऱ्यांमार्फत लालू नावाचा एक चोरटा गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या दुचाकीवर फिरताना दिसत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्याने १२ दुचाकी चोरल्याची कबुली दिली. ऋषभ उर्फ लालू असोपा असे अटक करण्यात आलेल्या या आरोपी चोरट्याचे नाव आहे.
लालू हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे. पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर तो दुचाकींची चोरी गिर्लफ्रेंडची हौस आणि तिला महागडे गिफ्ट देण्यासाठी करत असल्याची कबुली दिली.
काही महिन्यांपूर्वीच दुचाकी चोरी करताना त्याला अटक केली होती. त्यावेळी त्याने जेलची हवा खाल्ली होती. त्यानंतर पुन्हा त्याने प्रेयसीचे हट्ट पूर्ण करण्यासाठी बाईक चोरीचा सपाटा लावला होता.
चोरीच्या बाईक विकण्यासाठी लालू विविध कारणे खरेदी करणाऱ्याला सांगत असे. वडिलांच्या उपचाराकरता पैशाची गरज असल्याची थाप मारत तो या चोरलेल्या दुचाकी विकत असे. खरेदी करणाऱ्यालाही लालू विकत असलेल्या बाईक चोरीच्या आहे हे अनेकदा माहीत नसे. या मिळालेल्या पैशातून तो प्रेयसीचे हट्ट पूर्ण करत असे.