मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे सर्वांच्या नजरा या पावसाकडे लागून राहिल्या होत्या. पाऊस काही दिवसांसाठी गायब झाल्याने शेतकऱ्यांवर दुबार तिबार पेरणीचं संकट ओढावलं. त्यात आता शेतकरी आणि सर्वसामांन्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यातील विविध भागात मूसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. (heavy rain in coming 4 days in Mumbai Konkan and western Maharashtra predicts imd)
हवामान खात्यानुसार, आजपासून (11जुलै) पुढील 4 दिवस पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे राज्यात मुंबईसह, कोकण तसेच पुढील 4 दिवसात मूसळधार पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील काही भागात अति मूसळधार पाऊस पडू शकतो.
सोबतच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापुरातही जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर विदर्भ मराठवाड्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याती शक्यता आहे. हे अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आले आहेत.
हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट
हवामान विभागाने मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या अलर्टनुसार पुढील 3 दिवसांपर्यंत मुंबईतील काही ठिकाणी जोरदार पाऊस पडू शकतो. सर्वाधिक पाऊस हा मुंबई, ठाणे, रायगड आणि सिंधुदुर्गात होणार आहे.