विदर्भात सलग दुसऱ्या दिवशी उष्णतेचा कहर

उष्णतेच्या लाटा     

Updated: May 24, 2020, 07:30 PM IST
विदर्भात सलग दुसऱ्या दिवशी उष्णतेचा कहर title=

नागपूर : विदर्भात उष्णतेचा कहर सुरुच आहे. सलग दुसऱ्या दिवशी नागपुरात ४६.७ अंश सेल्सिअस अंश सेल्सिअस. या मोसमातील ही उच्चांकी नोंद असल्याचं सांगितलं जत आहे. नागपुरसह अकोला, चंद्रपूर आणि गोंदीया देखील तापमानाचा पारा ४६ अंशांवर पोहोचला आहे.  आज सकाळपासून विगर्भात चटके बसणार ऊन असून उकाडाही प्रचंड वाढला आहे. त्यामुळे नागरिक पहिल्या पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. 

लॉकडाऊनंतर रस्त्यावर थोडीफार वाहतूक दिसत होती. मात्र तीव्र उन्हामुळं आज रस्त्यांवरही शुकशुकाट दिसून येत आहे. त्याचप्रमाणे पुढील काही दिवस विदर्भात सूर्याचा प्रकोप असाच सुरु राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

विदर्भात सूर्याचा प्रकोप
नागपूर - ४६.७
अकोला- ४६.१
चंद्रपूर - ४६.६
गोंदीया - ४६.०
अमरावती - ४५.६

नागपूरसह पूर्ण विदर्भातील तापमानात गेल्या दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. हवामान खात्यानुसार येत्या काही दिवसात तापमानात आणखी वाढ होणार असल्याचा अंदाज असल्याने हवामान खात्यातर्फे जारी करण्यात आला आहे. नागपुरात आता कडक उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत.