Video : 'भाजप खतरनाक! मी शिंदेंना आधीच सांगितलेलं...' गप्पांच्या ओघात नाना पटोलेंकडून राजकीय गुपितं उघड

Loksabha Election 2024 : (Holi 2024) होळीच्या निमित्तानं सध्या सर्वत्र रंगांची उधळण पाहायला मिळत असतानाच राजकीय वर्तुळही यास अपवाद नाही.   

सायली पाटील | Updated: Mar 25, 2024, 11:34 AM IST
Video : 'भाजप खतरनाक! मी शिंदेंना आधीच सांगितलेलं...' गप्पांच्या ओघात नाना पटोलेंकडून राजकीय गुपितं उघड title=
holi 2024 Congress leader nana patole on mahayuti shares cryptic view on eknath shinde ajit pawar loksabha election

Holi 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) धर्तीवर राज्यात कमालीच्या घडामोडी घडत आहेत. यामध्ये अगदी सणावारांनाही राजकीय किनार मिळताना दिसत आहे. राजकारणाच्या वर्तुळात वावरताना एकमेकांवर कितीही आरोप प्रत्यारोप केले तरीही प्रत्यक्ष जीवनात अनेकदा ही मंडळी खऱ्या अर्थानं कमालीच्या खोडकर वृत्तीची असतात. होळी आणि धुळवडीच्या निमित्तानं काँग्रेस नेते नाना पटोले यांचा असाच चेहरा सर्वांसमोर आला. जिथं त्यांनी विनोदी गप्पांच्या ओघात अनेक राजकीय गुपितं उघड केली. 

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी धुळवडीच्या निमित्तानं राजकीय विरोधकांवर मार्मिक टीका केली. शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांना त्यांनी काही सल्लेही दिले. झी 24 तासशी संवाद साधताना होळी- धुळवडीच्या निमित्तानं नाना पटोले यांचं वेगळं रुप पाहायला मिळालं. 

'मित्र काही दुरुस्त होत नाहीत' असं म्हणत त्यांनी विरोधी बाकावर असणाऱ्या आपल्या मित्रांना उद्देशून म्हटलं..., 'त्यांना अजूनही माझा असा सल्ला आहे की सगळ्यांनी सगळ्यांना घेऊन पुढे जायचं असतं'. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सल्ला देत पटोले म्हणाले, 'महाराज व्हायला पाहतात ते महाराजही होऊ शकत नाहीत ती पण, आता ती वेगळीच जादू आहे'.  आम्ही शिंदेंना सल्ला दिला होता असं गुपित उघड करताना पटोलेंनी आपणही काही दिवस भाजपमध्ये असल्याचं सांगत हा खतरनाक पक्ष असल्याचं अनोख्या अंदाजात सांगितलं.  

'मी एकनाथ शिंदेंना आधीच सांगितलं होतं, की भाजप हा खतरनाक पक्ष आहे पण, त्यावर मीसुद्धा खतरनाक आहे असं उत्तर त्यांनी दिलं. पण, मुद्दा असा की, शिंदेंसोबत गेलेल्या खासदारांना आता जागाही (उमेदवारी) मिळू शकत नाही, तेव्हा आता एकनाथरावांची हालत किती खराब झाली आपण पाहतोय... त्यामुळं माझा सल्ला त्यांनी तेव्हा ऐकला असता तर ते मजेत राहिले असते', असं नाना पटोले मार्मिक अंदाजात म्हणाले.

हेसुद्धा वाचा : Mumbai News : ठरलं! 'या' तारखेला मुंबईतील 110 वर्षे ब्रिटीशकालीन पूल पाडणार; पुढील दोन वर्षे वाहतूक बंद 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविषयी विचारलं असता  त्यांची तर कमालच आहे, अशी टीप्पणी त्यांनी केली. अजित पवारांचे बंधूसुद्धा वेगळं बोलत आहेत, त्यामुळं त्यांच्याविषयी न बोललेलं बरं असं पटोलेंनी अनोख्या अंदाजात सांगितलं आणि राजकीय धुळवडीला आणखी रंगत आणली.