close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

धक्कादायक, डॉक्टर पतीने सरकारी वकील पत्नीचा केला खून

चारित्र्याच्या संशयावरून सरकारी वकील असलेल्या पत्नीचा डॉक्टर पतीने गळा आवळून खून केला. 

Updated: Jan 15, 2019, 05:05 PM IST
धक्कादायक, डॉक्टर पतीने सरकारी वकील पत्नीचा केला खून

जळगाव : चारित्र्याच्या संशयावरून सरकारी वकील असलेल्या पत्नीचा डॉक्टर पतीने गळा आवळून खून केल्याची खळबळजनक घटना जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे घडली आहे. याप्रकरणी जामनेरमध्ये आयुर्वेदाची प्रॅक्टिस करत असलेल्या डॉक्टर भरत लालसिंग याला जामनेर पोलिसांनी अटक केली आहे. गणेश सुरळकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून डॉक्टर भरत तसेच त्याचे वडील लालसिंग पाटील या दोघांवर जामनेर पोलिसांत खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरवातीला वकील पत्नीचा हृद्यविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा बनाव डॉक्टरने केला होता. 

मात्र विद्या यांचा खून करण्यात आल्याचा संशय नातेवाईकांना आला. त्यामुळे डॉक्टरांनी राखी तथा विद्या पाटील यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यांनतर त्यांची हत्या झाल्याचे उघड झाले आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी दिली. या खूनाचा तपास जामनेर पोलीस करीत आहेत.