बायकोने नवऱ्याकडे एवढाही हट्ट धरु नये की, त्यात्

 लग्नानंतर संसाराचा गाडा हाकताना याच प्रियकराची पुरती दमछाक होते. अशाच एका पतीवर पत्नीचा हट्ट पुरवण्याच्या नादात जेलमध्ये जाण्याची वेळ आली आहे.  

Updated: Dec 7, 2021, 10:59 PM IST
बायकोने नवऱ्याकडे एवढाही हट्ट धरु नये की, त्यात्

विशाल करोळे, झी मीडिया औरंगाबाद : लग्नाआधी प्रियकर प्रेयसीला चंद्र, तारे तोडून आणण्याचं स्वप्न दाखवतो. पण लग्नानंतर संसाराचा गाडा हाकताना याच प्रियकराची पुरती दमछाक होते. अशाच एका पतीवर पत्नीचा हट्ट पुरवण्याच्या नादात जेलमध्ये जाण्याची वेळ आली आहे. (husband stole from the temple because he had no money to pay for his wife's purse in Aurangabad)

पत्नीच्या नादात चोरटा बनलेला हाच तो पती. जावेद जुम्मा पठाण असं या चोरट्या पतीचं नाव आहे. औरंगाबादच्या चेलीपुरात हा जावेद राहतो. जावेदकडे त्याच्या पत्नीने 5 हजार रुपयांचा पर्स हवा, असा हट्ट धरला. स्त्री हट्टापुढे कुणाचंच काही चालत नाही. 

बायकोने केवळ हट्टच धरला नाही, तर पर्स आणली नाही, तर घरी यायचं नाही, अशी तंबीच जावेदला तिच्या पत्नीने दिली. 

पर्स घेण्यासाठी बिचाऱ्या जावेदच्या पाकीटात पैसे नव्हते. काय करावं असा विचा करत तो शहागंज भागात फिरत होता. तेव्हा त्याला झुलेलाल मंदिर दिसलं. जावेदची नजर दानपेटीवर गेली. 

जावेदनं मंदिरातल्या दानपेटीवर डल्ला मारला. जावेदने दानपेटीतील पैसे, मंदिरातील चांदीची मूर्ती आणि दिवे चोरले. तो यात यशस्वी झाला. मात्र पोलिसांनी अवघ्या 5 तासात  चोरीचे पुरावे सापडताच पोलिसांनी त्याला 5 तासांत अटक केली.

अनेकदा पाहिलंय की बायकोच्या हट्टापायी लोक काहीही करतात. मात्र इथं जावेदला थेट जेलवारीच करावी लागलीय. त्यामुळे बायकोचे लाड पुरवा, मात्र परिस्थितीचं भानही ठेवा, नाहीतर तुम्हीही जावेदसारखे गोत्यात याल.