पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यामध्ये राष्ट्रवादीचा सहभागाची चर्चा होती. मात्र, या चर्चेला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीच पूर्नविराम दिलाय. मी आता कशाचेही नेतृत्व करणार नाही, असे सांगत त्यांनी राष्ट्रवादीच्या सहभागाचे वृत्त फेटाळून लावले.
केंद्रीय मंत्रिमंडळात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे नाव चर्चेत असल्याची चर्चा होती. याबाबत शरद पवार यांना विचारलं असता, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कोणीही नेता मंत्रीमंडळात जाणार नाही, असे आपण अध्यक्ष या नात्याने मी सांगतो. दरम्यान, त्याआधी सुप्रिया सुळे यांनीही कोणीतरी बातम्या पेरतो आहे, असे सांगत पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता.
शरद पवार म्हणालेत, माझे वय ७५ होऊन गेले आहे. मी आता जबाबदारी घेणार नाही. देशात भाजप विरुध्द विरोधकांचे नेतृत्व करावे, अशी इच्छा सर्वांची आहे.