IAS Pooja Khedkar Case: संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मागील काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरत असलेल्या पुण्यातील आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरण थेट दिल्लीपर्यंत पोहचलं आहे. या प्रकरणामध्ये आता थेट केंद्र सरकारने लक्ष घातलं आहे. खासगी ऑडीवर लाल दिवा लावल्याने चर्चेत आलेल्या पूजा खेडकर यांची निवड आणि त्यासाठी त्यांनी वापरलेला मार्ग या दोन्ही गोष्टी सध्या चांगल्याच चर्चेत आहेत. प्रशिक्षणार्थ असतानाही केबिन, स्वीय सहाय्यक यासारख्या गोष्टींची मागणी करण्याबरोबरच आता दिव्यांग असल्याचं प्रमाणपत्र असो किंवा नॉन क्रिमीलेअरचं प्रमाणपत्र असो साऱ्याच गोष्टी वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत.
चुकीच्या कागदपत्रांच्या माध्यमातून पूजा यांची निवड झाली का अशी शंकाही उपस्थित केली जात आहे. म्हणूनच आता थेट पंतप्रधान कार्यालयाने या प्रकरणात लक्ष घातलं असून यासंदर्भातील माहिती मागवली आहे. तसेच देशातील सनदी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणाऱ्या लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासकीय अकदमीने (एलबीएसएनएए) सुद्धा यासंदर्भातील अहवालही महाराष्ट्र सरकारकडून मागवला आहे.
पूजा खेडकर यांच्या गैरवर्तनासंदर्भातील सविस्तर तपशील पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी अतिरिक्त मुख्य सचिव नितीन गद्रे यांना पाठवला आहे. यापूर्वी दिवसे यांनी लिहिलेल्या पत्रातून पूजा यांच्या वागणुकीसंदर्भात तक्रार त्यांनी केली होती. त्यानंतर पूजा यांची वाशिम येथे बदली झाली. मात्र या बदलीमागे गैरवर्तवणूक किंवा नेमकं काय कारण आहे याचा उल्लेख टाळून केवळ प्रशासकीय बदली असल्याचं सांगण्यात आलं. मात्र अशाप्रकारे प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्याची बदली होण्याची घटना फारच दुर्मिळ मानली जाते. त्यातच आता नवीन नवीन माहिती समोर येत असल्याने पूजा यांची नोकरीही जाऊ शकते असंही म्हटलं जात आहे.
नक्की पाहा >> पूजा खेडकरच्या आईचा प्रताप! शेतात घुसून पिस्तुल दाखवून शेतकऱ्यांना धमकावलं; पाहा Video
पंतप्रधान कार्यालयानेही पूजा खेडकर यांच्यासंदर्भातील अहवाल पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडून मागवला असल्याचं वृत्त 'हिंदुस्तान टाइम्स'ने दिलं आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र सरकारने केवळ बदली केली असली तरी पूजा यांच्यावर थेट दिल्लीतून कारवाई होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. केवळ पंतप्रधान कार्यालयच नाही तर एलबीएसएनएएनेही पूजा यांच्या प्रशिक्षण काळातील अहवाल मागवला आहे. एलबीएसएनएएचे उपसंचालक असलेल्या शैलेश नवल यांनी राज्य सरकारच्या सामन्य प्रशासन विभागाकडे पूजा खेडकर यांच्यासंदर्भातील अङवला मागवला आहे. मुख्य सचिव सुजाता सौनिक यांची स्वाक्षरी असलेला अहवाल पाठवावा, असे निर्देश एलबीएसएनएएने दिल्याचं 'हिंदुस्तान टाइम्स'ने म्हटलं आहे.
स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.
...Read More|
NEP
(50 ov) 239/9
|
VS |
UAE
243/6(49.1 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
AUS
(20 ov) 186/6
|
VS |
IND
188/5(18.3 ov)
|
| India beat Australia by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.