Vadodara-Mumbai Expressway : बडोदा जेएनपीटी महामार्गावर महाराष्ट्रातला सर्वात लांब बोगदा तयार करण्यात आलाय. माथेरान डोंगरात हा बोगदा खोदण्यात आला आहे. बदलापूर ते पनवेल असा सव्वाचार किलोमीटर लांबीचा हा बोगदा आहे. या बोगद्याचं काम 15 महिन्यांच्या विक्रमी कालावधीत पूर्ण करण्यात आलंय. या बोगद्यामुळे बदलापूर आणि नवी मुंबईला एक नवीन कनेक्टिव्हिटी मिळणार आहे.
हा बोगदा 22 मीटर रुंद असून त्यात चार मार्गिका असणारेत.सध्या बोगद्यांच्या आतमध्ये प्लॅस्टरिंगचं काम सुरू असून त्यानंतर रस्ते आणि अन्य कामं केली जाणारेत. बदलापूर ते पनवेल हा प्रवास अवघ्या 10 मिनिटात करता येणं शक्य होणार आहे. तर बदलापूर ते मुंबई हा प्रवास अटल सेतू मार्गे अवघ्या 30 ते 40 मिनिटात करता येणार आहे.
या महामार्गामुळे जेएनपीटी बंदर येथून वाहतूक करणाऱ्या वाहनांना बदलापूर मार्गे समृद्धी महामार्ग आणि दिल्ली-वडोदरा महामार्गाला कनेक्टीव्हीटी मिळणार आहे. या बोगद्यामुळे पनवेल, तळोजा, कल्याण या मार्गावरील वाहतुकीचा ताण कमी होणार आहे. दुसऱ्या बोगद्याचं काम 80 टक्के पूर्ण झालं आहे. या दुसऱ्या बोगद्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे. ऑक्टोबर महिन्यात या दुसऱ्या बोगद्याचं काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. दोन्ही बोगद्यांची मध्यभागांची उंची ही 13 मीटर आणि 22 मीटर इतकी आहे.
माथेरानच्या डोंगराखालून दिल्लीचा बोगदा निघणाराय...त्यामुळे मुंबईहून 12 तासांत राजधानी दिल्ली गाठता येणार आहे...जगातील सर्वांत लांब म्हणून ओळखल्या जाणा-या आणि दिल्ली ते उरणच्या जेएनपीटी बंदरास जोडणा-या 1350 किमीच्या मार्गाचं काम सुरू होतंय...यासाठी माथेरानच्या इको सेन्सेटिव्ह झोनच्या डोंगररांगातून 4.39 किमीचा आठ पदरी बोगदा लवकरच खोदला जाणाराय...पनवेलजवळ माथेरानच्या पायथ्याशी मोरबे गावापासून हा बोगदा सुरू होणार असून, तो ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथनजीकच्या भोज गावापर्यंत असेल...पर्यावरण खात्याची परवानगी मिळाल्यानंतर त्याच्या बांधकामाचं कंत्राट नॅशनल हायवे अॅथॉरिटीने इरकॉन कंपनीला दिलंय...बोगद्यांवर 1 हजार 453 कोटींचा खर्च होणार आहे...यामुळे दिल्ली-मुंबई रस्त्याचं अंतर 24 तासांवरून 12 तासांवर येणार असून, हा ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस-वे आठ पदरीचा आहे...त्यावर एक लाख कोटी खर्च करण्यात येणाराय...