नांदेड : नांदेडमध्ये ज्वेलर्सच्या दुकानातून महिला चोरट्यांनी दागिने लंपास केल्याची घटना घडलीय. हा चोरीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झालाय.
नांदेड शहरातील श्रीनगर भागात श्री बालाजी ज्वेलर्स हे दुकान आहे. दुकान मालक दुपारच्या सुमारास एकटेच होते. यावेळी चलाखी दाखवत महिलांनी दागिने खरेदी करण्याचा बहाणा केला. दागिने दाखवत असताना दुस-या महिलेना दागिनांचा ट्रेच पसार केला.
हा संपूर्ण प्रकार सुरूवातीला दुकानदाराच्या लक्षात आला नाही. मात्र सीसीटीव्ही पाहिल्यानंतर चोरीचं झाल्याच लक्षात आलं. याप्रकरणी भाग्यनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय.