Karnala Bank Scam : माजी आमदार विवेक पाटील यांना ईडीची कोठडी

 कर्नाळा सहकारी बँक घोटाळाप्रकरणी (Karnala Bank Scam) शेकापचे माजी आमदार विवेक पाटील ( former MLA Vivek Patil) यांना ईडीने (ED) काल ताब्यात घेतले होते.  

Updated: Jun 16, 2021, 03:44 PM IST
Karnala Bank Scam : माजी आमदार विवेक पाटील यांना ईडीची कोठडी  title=

नवी मुंबई : रायगड जिल्ह्यातील कर्नाळा सहकारी बँक घोटाळाप्रकरणी (Karnala Bank Scam) शेकापचे माजी आमदार विवेक पाटील ( former MLA Vivek Patil) यांना ईडीने (ED) काल ताब्यात घेतले होते. त्यांना 25 तारखेपर्यंत ईडीची कोठडी ठोठावण्यात आली आहे. कर्नाळा बॅंक घोटाळ्याबाबत ईडीने त्यांना अटक केली होती. 

कर्नाळा सहकारी बँकेत सुमारे 600 कोटीचा घोटाळा (Karnala Bank Scam) झाल्याचे समोर आले आहे. या घोटाळाप्रकणात शेकापचे माजी आमदार विवेक पाटील ( Vivek Patil) यांचा हात असल्याचे पुढे आले आहे. त्यांनी ठेवीदारांच्या नावे बोगस कर्ज घेतल्याचे उघड झाले आहे. त्यानंतर त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता. काल त्यांना ईडीने (ED) ताब्यात घेतले होते.

विवेक पाटील यांना पनवेलमधून ताब्यात घेण्यात आल्यानंतर त्यांना ईडीच्या न्यायालयात आणण्यात आले. आज त्यांना 25 तारखेपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली. 

दरम्यान, कर्नाळा सहकारी बँकेत घोटाळा (Karnala Bank Scam) झाल्याचे पुढे आल्यानंतर बँकेच्या व्यवहारांवर मर्यादा घालण्यात आली होती. काल या प्रकरणात ईडीने (ED) कारवाई केली. कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणात संचालकांसह 76 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  कोट्यवधींचा अपहार केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.