Kasba Bypoll Election: कसबा पोटनिवडणुकीची लंडनमध्ये क्रेझ; 24 तासांचा प्रवास अन् बजावला मतदानाचा हक्क!

Kasba By Election: कसब्यातील एका हौशी तरुणीने (Amrita Devkar) साता समुद्रापाराहून मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आली आहे. 24 तासांचा प्रवास करून मतदानाचा हक्क बजावल्याने तिचं सर्वत्र कौतूक होताना दिसत आहे.

Updated: Feb 26, 2023, 04:41 PM IST
Kasba Bypoll Election: कसबा पोटनिवडणुकीची लंडनमध्ये क्रेझ; 24 तासांचा प्रवास अन् बजावला मतदानाचा हक्क! title=
Amrita Devkar-Mahajan

Kasba By Election: कसबा पोटनिवडणुकीची (Kasba Bypoll Election) फक्त महाराष्ट्रातच नाही तर लंडनमध्ये देखील क्रेझ पहायला मिळत आहे. लंडनमध्ये (Londan) वास्तव्यास असलेल्या अमृता देवकर-महाजन (Amrita Devkar-Mahajan) यांनी घरी जाण्याआधी नुमवी शाळा (Numvi School Pune) येथे हजेरी लावून मतदानाचा (Voting) हक्क बजावला. थेट लंडनवरून कसब्यातील मतदान केंद्रावरच हजेरी लावत त्यांनी पुणेकरांना नवी उर्जा दिली आहे. पुण्यात (Pune News) दोन मतदारसंघांत आज पोटनिवडणुकीचे मतदान सुरु आहे. 

पुणेकर मतदारांना सुट्टी असल्यानं मतदानाचा हक्क बजावा असं नेत्यांनी सांगितलं आहे. आता मतदार पोटनिवडणुकीला किती हौशी असतात हे साऱ्यांनाच माहिती आहे. परंतू कसब्यातील एका हौशी तरुणीने (Amrita Devkar) सातासमुद्रापार येऊन मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आली आहे. 24 तासांचा प्रवास करून मतदानाचा हक्क बजावल्याने तिचं सर्वत्र कौतूक होताना दिसत आहे.

अमृता देवकर-महाजन या मुळच्या पुण्याच्या आहेत आणि कसबा पेठेत (Kasba Peth) त्यांचं घर आहे. पोटनिवडणूक जाहीर झाल्याने त्यांनी लवकर पुण्यात येण्याचा निर्णय घेतला. रविवारी पहाटे मुंबईत दाखल झाल्या. त्यानंतर चार तासात त्या पुण्यात पोहोचल्या. मुंबई - पुणे प्रवास (Mumbai-Pune) केल्यानंतर त्यांनी घरी न जाता मतदान केंद्रावर जाण्याचा निर्णय घेतला. त्याचे भाऊ विक्रांत देवकर देखील त्यांच्या सोबत होते. 

आणखी वाचा - Pune Bypoll Election: कसबा पोटनिवडणुकीत रूपाली ठोंबरेंनी केला गोपनीयतेचा भंग? निवडणूक आयोग कारवाई करणार का?

काय म्हणाल्या अमृता देवकर?

तू पुण्याला येतीयेस तर नक्की मतदान कर, असं माझ्या घरच्यांचं म्हणणं होतं. मी विचार केली की, वोटिंग करणं गरजेचं आहे. मी मागच्यावेळेस ज्यावेळी मतदान होतं. तेव्हाही मी आले होते आणि मतदान केलं होतं, असं अमृता सांगतात. तरूण समाजाला दिशा देतील. आपण पुढाकार घेतला पाहिजे, असं मत देखील अमृता यांनी नोंदवलं आहे.

पुण्यात किती टक्के मतदान

चिंचवडमध्ये (Chinchwad Bypoll Election) सकाळी 11 वाजेपर्यंत तब्बल 12 टक्के मतदान झाल्याची माहिती समोर आली आहे. तर कसबा विधानसभा (Kasba Bypoll Election) मतदारसंघात सकाळी 11 वाजेपर्यंत 8.25 टक्के मतदान झालंय.