अतिक्रमणाविरोधात केडीएमसीची धडक कारवाई

कल्याण डोंबिवलीतल्या पदपथांवर असलेली अतिक्रमणं काढण्यासाठी मनपाने धडाक्यात कारवाई सुरू केली. कल्याण पश्चिमेच्या क प्रभागातून ही कारवाई सुरू झाली आहे. स्वतः आयुक्त गोविंद बोडके या कारवाईवेळी उपस्थित होते. 

Updated: Nov 13, 2018, 08:59 PM IST
अतिक्रमणाविरोधात केडीएमसीची धडक कारवाई title=

कल्याण : कल्याण डोंबिवलीतल्या पदपथांवर असलेली अतिक्रमणं काढण्यासाठी मनपाने धडाक्यात कारवाई सुरू केली. कल्याण पश्चिमेच्या क प्रभागातून ही कारवाई सुरू झाली आहे. स्वतः आयुक्त गोविंद बोडके या कारवाईवेळी उपस्थित होते. 

उद्यापासून महापालिकेच्या १० प्रशासकीय प्रभागात ही कारवाई होणार आहे. कारवाईचा हा पहिला टप्पा असून दुसऱ्या टप्प्यात अनधिकृत टपऱ्या आणि गॅरेजेसवर कारवाई होणार आहे.