कोल्हापुरात एलियन्स? बापरे... हा Video पाहून तुम्हीही इतकंच म्हणाल

निरखून पाहा.... 

Updated: Aug 2, 2022, 10:47 AM IST
कोल्हापुरात एलियन्स? बापरे... हा Video पाहून तुम्हीही इतकंच म्हणाल  title=
kolhapur people finds worm looking like an aliens Video viral

कोल्हापूर : अंतराळाविषयी सर्वांनाच कुतूहल वाटतं. कुतूहलापोटी पडणारे प्रश्न, त्या प्रश्नांची मिळणारी बहुविध उत्तरं आणि त्यान उत्तरांतून मिळणारं समाधान ही कुतूहलाची साखळी, असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. अशाच कुतूहलपूर्ण वातावरणात महाराष्ट्रामध्ये सध्या एक असं दृश्यं दिसत आहे ज्यावर तुमचा विश्वासच बसणार नाही. पण हे खरंय. (kolhapur people finds worm looking like an aliens Video viral)

कोल्हापुरातील हुपरीमध्ये एलियन्ससारखी दिसणारी एक अळी आढळली आहे. एलियन्ससारख्या दिसणाऱ्या या अळीबाबत सध्या या भागात प्रचंड कुतूहल पाहायला मिळत आहे. हातकणंगले तालुक्यातील हुपरीत निसर्गाचा आविष्कार अनेकांना अवाक् करत आहे. 

जगभरात एलियन्ससंदर्भात प्रचंड गूढ आहे. अगदी ते अस्तित्वात आहेत की नाहीत इथपासून त्याची सुरुवात होते. किंबहुना याबाबत अनेक दावेही करण्यात येतात. पण, नेमकं सत्य मात्र या दाव्यांपुढे जाऊ शकलेलं नाही. 

आता हातकणंगले तालुक्यातल्या हुपरीत मात्र एक कुतूहल निर्माण करणारा, वैशिष्ट्यपूर्ण आविष्कार पहायला मिळत असल्यामुळे सर्वजण ऐराण आहेत. हुपरीतल्या सचिन पाटील नावाच्या व्यक्तीच्या अंगणातल्या झाडावरील पानावर एलियन्ससारखी दिसणारी अनोखी अळी आढळून आली आहे. या अळीचा चेहरा एखाद्या एलियन्ससारखा दिसतोय. आता ही अळी आहे, अळीसारखा दिसणारा एलियन आहे, की एलियनसारखी दिसणारी अळी हे तुम्हीच व्हिडीओ पाहून ठरवा.