Maharashtra Breaking News LIVE Updates : राज्यभरातील शिवसेना UBTच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. पालघर, मुरबाड, नवी मुंबई, धुळे, बीड, परभणी जिल्ह्यतल्या शिवसेना UBTच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश झाला.
महाराष्ट्रात या सर्व घडामोडी घडत असतानाच आठवड्याच्या सुरुवातीला आता बीड सरपंच हत्या प्रकरणात आणखी कोणत्या घटना लक्ष वेधणार, या संदर्भातील सर्व अपडेट एका क्लिकवर...
6 Jan 2025, 11:47 वाजता
तुळजाभवानीच्या दर्शन व्यवस्थेत अचानक बदल
तुळजाभवानीच्या दर्शन व्यवस्थेत अचानक बदल. तुळजाभवानी मंदिराच्या गाभाऱ्याचे काम सुरू, सेंड ब्लास्टिंग मुळे गाभाऱ्यात धूळ व कचरा. तुळजाभवानीचे दर्शन गाभाऱ्यातून करण्यात आले बंद. बांधकाम सुरू असल्याने देवीच्या दर्शन व्यवस्थेत बदल ,भाविकांना सूचना न देता मंदिर संस्थांनी केला बदल. तुळजाभवानीचे दर्शन, आरती खिडकीतून सध्या सुरू. मंगळवारी पहाटेपर्यंत दर्शन पूर्वत होण्याची अपेक्षा. दिवस-रात्र काम सुरू असतानाही दर्शन व्यवस्थेत अचानक बदल झाल्याने भाविकात मोठी नाराजी
6 Jan 2025, 11:43 वाजता
धाराशिवमध्ये दोन 2 गटात हाणामारी; चौघांचा मृत्यू
धाराशिवमध्ये दोन 2 गटात हाणामारी झाली असून, या हाणामारीत 4 जणांचा मृत्यू झाला असून, मृतांमध्ये 3 पुरुष आणि एक महिला मृत्युमुखी पडले आहेत. वाशी तालुक्यातील बावी पिडी इथं ही घटना घडली. शेतात पाणी देण्यावरून वाद झाल्याची माहिती. मध्यरात्री रात्री घडली घटना येरमाळा पोलिसात गुन्हा दाखल.
6 Jan 2025, 11:41 वाजता
भारतात सापडला एचएमपीवी विषाणूचा दुसरा रुग्ण
भारतात एचएमपीवी व्हायरसचा आणखी एक रुग्ण सापडला असून, आता रुग्णसंख्या 2 वर पोहोचली आहे. कर्नाटकातच बंगळुरू इथं एका तीन महिन्याच्या मुलीला या विषाणूजन्य संसर्गाची लागण झाली आहे.
6 Jan 2025, 10:32 वाजता
भारतात सापडला एचएमपीवी विषाणूचा पहिला रुग्ण...
भारतात HMPV व्हायरसचा पहिला रुग्ण आढळला असून, बंगळुरूमध्ये 8 महिन्यांच्या रुग्णाला या विषाणूची लागण झाल्याचं सांगितलं जात आहे. मुलीनं चीनचा प्रवास न केल्याची महत्त्वाची बाब इथं लक्ष घेण्याजोगी आहे.
6 Jan 2025, 10:17 वाजता
बीड सरपंच हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर
विष्णू चाटे याला आज पुन्हा कोर्टासमोर हजर केले जाणार बीड:विष्णू चाटे याला आज पुन्हा कोर्टासमोर हजर केले जाणार. संतोष देशमुख हत्या प्रकरणांमध्ये विष्णू चाटे ला सहा तारखेपर्यंत सुनावण्यात आलेली होती पोलीस कोठडी. सीआयडीच्या अधिकारी आज विष्णू चाटेला कोर्टात पुन्हा करणार हजर. विष्णू चाटेला केज च्या कोर्टामध्ये केलं जाणार हजर
6 Jan 2025, 09:46 वाजता
त्र्यंबकेश्वर मंदिरात आलेल्या भाविकांना पिसाळलेल्या कुत्र्यांचा चावा
नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात एका पिसाळलेल्या कुत्र्याने दहा जणांना घेतला चावा. यामध्ये पाच मुलांसह शालेय मुलाचा समावेश. जखमींना त्र्यंबकेश्वर प्राथमिक आरोग्य केंद्रात तातडीने दाखल करण्यात आले. पिसाळलेल्या कुत्र्याने अंधाधुंद हल्ला केला, ज्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मंदिर परिसर भागात ही घटना घडली. जखमींमध्ये नाशिक, उत्तर प्रदेश, तेलंगणा आणि इतर ठिकाणाहून आलेल्या नागरिकांचा समावेश. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची स्थानिकांची मागणी.
6 Jan 2025, 09:44 वाजता
आंतरराष्ट्रीय विमानतळावर सिगारेट आणि औषधांची तस्करी
कार्गोद्वारे अवैधरित्या लंडनला पाठविण्यात येणारी 74 हजार कॅप्सूल औषधे आणि 24400 सिगारेट सिगारेट्स राष्ट्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाने जप्त केली आहेत. त्यांची किंमत सुमारे 75 लाख रुपये आहे. औषधांच्या तस्करीत गुंतलेल्या एका आंतरराष्ट्रीय ड्रग्ज सिंडिकेटची माहिती एनसीबीला मिळाली होती. त्यानुसार 3, 4 जानेवारीदरम्यान एअर कार्गो टर्मिनल परिसरात शोधमोहीम राबवण्यात आली. एनसीबीने दोन कंटेनरवर पाळत ठेवून त्यांची तपासणी केली. यूडीएक्स वर्ल्डवाइडच्या इतर कंटेनरची झडती घेतली असता, विविध बँडच्या 24400 सिगारेट जप्त करण्यात आल्या आहेत. हा सर्व साठा खाद्यपदार्थांच्या पिशव्यांमधून नेण्यात येत होता.
6 Jan 2025, 09:38 वाजता
रात्रीच्या सुमारास धारदार शस्त्र घेऊन फिरणाऱ्या अज्ञात चोरांच्या टोळीची दहशत
पुणे सातारा महामार्गालगत असणाऱ्या सारोळा आणि सावरदरे गावात, रात्रीच्या सुमारास धारधार शस्त्र घेऊन फिरणाऱ्या अज्ञात चोरांच्या टोळीची दहशत. गावातील सतर्क नागरिकाच्या मध्यरात्री गावातून ही टोळी फिरताना निदर्शनास आल्याने घटना उघडकिस. नागरिकांच्या सतर्कतेमुळं चोरटे पळून गेल्यानं कुठलीही अनुचित किंवा चोरीची घटना घडलेली नाही. मात्र धार धार शस्त्र घेऊन फिरताना ही अज्ञात टोळी, गावात ठिकठिकाणी लावलेल्या cctv कॅमेरात कैद. मध्यरात्री गावात फिरणाऱ्या शश्त्रधारी या अज्ञात चोरांमुळं गावातील नागरिकांमध्ये दहशत. पोलिसांकडून नागरिकांना सतर्क राहून खबरदारी घेण्याचे आवाहन.
6 Jan 2025, 09:10 वाजता
एसटी घोटाळ्याची चौकशी सुरू; मुख्यमंत्र्यांना अंधारात ठेवून...
राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) 1310 बसच्या खरेदी प्रक्रियेची चौकशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने सुरू झाली असून निविदा प्रक्रियेची सर्व कागदपत्रे सादर करण्याचे आदेश महामंडळास देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे खरेदीसाठी 21 विभागनिहाय निविदा काढण्याच्या संचालक मंडळाच्या प्रस्तावास तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली असताना महामंडळाच्या स्तरावर निविदेतील अटी-शर्ती बदलण्यात आल्याचे समोर आले आहे.
6 Jan 2025, 09:09 वाजता
आर्वी तालुक्यातील सावळापूर शिवारात 70 जनावरांना विषबाधा
आर्वी तालुक्यातील सावळापूर शिवारात 70 जनावरांना विषबाधा. 11 जनावरांचा मृत्यू. प्रकृती बिघडलेल्या 59 जनावरांवर उपचार सुरू. कपाशीच्या शेतात चराईत जास्त प्रमाणात कपाशीची बोंड खाण्यात आल्यानं विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून जनावरांवर उपचार. प्रयोगशाळेचा अहवाल मिळाल्यानंतर कारण स्पष्ट होणार.