Maharashtra Breaking News LIVE Updates : राज्यभरातील शिवसेना UBTच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. पालघर, मुरबाड, नवी मुंबई, धुळे, बीड, परभणी जिल्ह्यतल्या शिवसेना UBTच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश झाला.
महाराष्ट्रात या सर्व घडामोडी घडत असतानाच आठवड्याच्या सुरुवातीला आता बीड सरपंच हत्या प्रकरणात आणखी कोणत्या घटना लक्ष वेधणार, या संदर्भातील सर्व अपडेट एका क्लिकवर...
6 Jan 2025, 06:42 वाजता
केशर आंब्याची पहिली पेटी दाखल
कोकणातील केशर आंब्याची पहिली पेटी मुंबई मार्केट मद्ये आली असून, हापूस आंबा आधी केशर आंबा मार्केटमध्ये दाखल होणार आहे. देवगड तालुक्यातील शेतकरी शकील मुल्ला यांच्या आंबा बागेतील ही पेटी असून यावर्षी च्या आंबा हंगामातील पहिली केशर आंबा पेटी असणार आहे ,पाच डझन ची ही पेटी असून मुंबई एपीएमसी मार्केट ला त्यांनी ही पहिली पेटी पाठवली आहे.
6 Jan 2025, 06:41 वाजता
अखेर राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुजवून रस्ता केला खड्डे मुक्त..!
मुंबई नाशिक महामार्गावर पडघा-खडवली बायपास जवळ नवीन उड्डाण पूलाच्या निर्मितीचे काम सुरू असून करीता बाह्यवळण रस्ते तयार केलेतं. परंतु या रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे सततची वाहतूक कोंडी होऊन धुळीचे साम्राज्य पसरत असल्याने वाहन चालकांसह नागरीकांना याचा त्रास सहन करवा लागत होता. तसेच पूलाचे काम अत्यंत संथगतीने सुरू असून, वाहतूक धिम्या गतीने सुरू असून सततच्या वाहतूक कोंडीमुळे नागरीक व वाहन चालक हैराण झालेत. राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने याबाबींकडे लक्ष केंद्रित करून बाह्यवळण रस्ते दुरुस्ती करुन धुळीची समस्या सोडवावी या संदर्भाची झी २४ तासने बातमी प्रसिद्ध करताच याची दखल घेऊन रस्त्यावर डांबर पडली असून उड्डाणपुलाच्या कामाही गती आली आहे.