Maharashtra Breaking News LIVE Updates : राज्यभरातील शिवसेना UBTच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. पालघर, मुरबाड, नवी मुंबई, धुळे, बीड, परभणी जिल्ह्यतल्या शिवसेना UBTच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश झाला.
महाराष्ट्रात या सर्व घडामोडी घडत असतानाच आठवड्याच्या सुरुवातीला आता बीड सरपंच हत्या प्रकरणात आणखी कोणत्या घटना लक्ष वेधणार, या संदर्भातील सर्व अपडेट एका क्लिकवर...
6 Jan 2025, 08:48 वाजता
धाराशिव जिल्ह्यात सर्वपक्षीय मूक मोर्चा
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ धाराशिव जिल्ह्यात सर्वपक्षीय मूक मोर्चाय. 11 जानेवारीला निघणार धाराशिव शहरात मोर्चा. मनोज जरांगे पाटील राहणार मोर्चाला उपस्थित. जिल्हाभर मोर्चाची जय्यत तयारी सुरू.
6 Jan 2025, 08:32 वाजता
पालघर मध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के
पालघर मध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के . पहाटेच्या सुमारास दोन सलग लागलेल्या भूकंपाच्या धक्क्याने पालघर हादरलं . पालघर च्या बोर्डी , दापचरी , तलासरी भागात जाणवले भूकंपाचे धक्के . सतत बसणाऱ्या धक्क्यामुळे परिसरात भीतीच वातावरण . 4.35 च्या सुमारास लागलेल्या धक्क्याची तीव्रता 3.7 रिश्टर स्केल .
6 Jan 2025, 08:31 वाजता
दाट धुक्यामुळे तब्बल 32 विमानांना उशीर
दिल्लीतील दाट धुक्याचा परिणाम विमान सेवेवर होत आहे. यामुळे अनेक विमानांना उशीर होत आहे. शनिवारी दिल्लीहून येणाऱ्या आणि पुण्यातून जाणाऱ्या तब्बल 32विमानांना उशीर झाला, तर रविवारीदेखील काही विमानांना धुक्याचा फटका बसला आहे. यामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. सकाळच्या सुमारास दिल्लीमध्ये दाट धुके पडले होते. यामुळे दिल्लीहून जाणाऱ्या आणि येणाऱ्या विमानांना फटका बसला आहे. दाट धुक्यामुळे दिल्ली येथे विमानांचे उड्डाण थांबविण्यात आले होते. त्यामुळे पुण्यातून दिल्ली व इतर ठिकाणी जाणाऱ्या तब्बल 31विमानांना अर्ध्या तासांपासून ते तीन तासांपर्यंत उशीर झाला. त्यामुळे पुणे व दिल्ली विमानतळावर मोठी गर्दी होत आहे.
6 Jan 2025, 07:54 वाजता
थंडीचा कडाका आणखी वाढणार
राज्यात थंडीचा कडाका आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला होता. त्यानुसार आता राज्यात थंडीचा जोर वाढला आहे. येत्या तीन दिवसात थंडीचा कडाका आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. उत्तरेकडील अतिशीत वारे राज्यात येत असल्याने राज्यात हुडहुडी भरवण्याची थंडी जाणवणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
6 Jan 2025, 07:22 वाजता
अवैध पिस्तूल, एका जीवंत काडतुसासह दोघांना अटक
गोंदिया जिल्ह्यातील आमगाव पोलीस स्टेशन हद्दीत अवैध शस्त्र बाळगणारे, चोरी घरफोडी करणाऱ्या गुन्हेगारांचा शोध, गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करीत असताना पथकास रिसामा येथील स्थानिक नागरीकांकडुन माहिती मिळाली की, नरेश तिराले हा त्याचे जवळील पिस्तूल द्वारे लोकांच्या मनात भिती घालुन दहशत माजवत होता. परंतु त्याच्या भितीमुळे लोकांनी त्याचेविरूध्द तक्रार दिलेली नाही. पण पोलिसांनी त्याच्या घरी धाड टाकली असताना एक पिस्तूल व काळतुस आढळून आले. पोलिसांनी या प्रकरणी दोन आरोपींना अटक करत गुन्हा दाखल केला.
6 Jan 2025, 07:12 वाजता
पश्चिम रेल्वेने रेल्वेस्थानकावर विश्रामगृह
पश्चिम रेल्वेने रेल्वेस्थानकावर विश्रामगृह उघडण्याचा घेतला निर्णय. प्रवाशांना आता रेल्वे स्थानकावर मिळणार विमानतळासारख्या सुविधा. या प्रकल्पाअंतर्गत रेल्वे काही स्थानकावर डिजिटल लाउंज उभारण्यात येईल. यामध्ये चार्जिंग प्लग पॉइंट, वायफाय, कॅफे, खुर्च्या, टेबल सोफा यासारख्या अनेक सुविधा होणार उपलब्ध. फक्त रेल्वे प्रवाशीच नाही तर इतरांसाठी देखील ही सुविधा असेल.
6 Jan 2025, 06:46 वाजता
11 तारखेला बीड हत्या कांडातील फरार आरोपी भिवंडीत दाखल
बीड मस्साजोग येथील आरोपी ११ डिसेंबर रोजी भिवंडीतील वळगाव येथील स्वरीत बिअर शॉप व हॉटेल दिपाली वाईन आणि डाईन बार एंड रेस्टॉरंट येथे आले असल्याची बातमी समोर आलीयं.
6 Jan 2025, 06:43 वाजता
घरफोडी करणारी आंतरराज्य टोळी जेरबंद
घरफोडी करणाऱ्या आंतरराज्य टोळीला सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जेरबंद केले आहे.तिघांना अटक करत त्यांच्याकडून पाच लाखांच्या रोकडसह साडे पाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.या तिघांच्याकडून दोन गुन्हे उघडकीस आले असून हे तिघेही कर्नाटक राज्यातल्या होसपेठ येथील आहेत.मिरज तालुक्यातल्या तानंग फाटा येथेही संशयतरित्या फिरत असताना तिघांना ताब्यात घेण्यात आले होता, यावेळी त्यांच्याकडून चोरीतील पाच लाखांची रोकड व दुचाकी मिळाली होती.
6 Jan 2025, 06:43 वाजता
नवी मुंबईत शिवसेना ठाकरे गटाला खिंडार
नवी मुंबईत शिवसेना ठाकरे गटाला खिंडार पडले असून, ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष द्वारकानाथ भोईर पक्षाला सोडचिठ्ठी देत शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाणे येथे द्वारकानाथ भोईर यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि काही माजी नगरसेवकानी शिवसेनेत प्रवेश केला आहे. द्वारकानाथ भोईर विधानसभा निवडणुकीत तिकीट नाकारल्याने नाराज होते आगामी. मनपा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर ठाकरे गटाला मोठा झटका बसला आहे.
6 Jan 2025, 06:42 वाजता
क्रिकेट खेळताना तरुणांचा मृत्यू
क्रिकेट खेळताना ३४ वर्षीय झुबिन राजेंद्र दामजी या तरुणाचा हृदयविकारामुळे दुरदैवी मृत्यू झाला आहे . वाशीत सेक्टर ९ मध्ये राहणारा झुबिन माटुंग्याचे डॉन बॉस्को शाळेच्या मैदानात गावाकडून आलेल्या मित्रांसोबत क्रिकेट चे सामने खेळायला गेला होता , खेळा दरम्यान दोन सिक्सर मारून तिसरा सिक्सर मारते वेळी हृदयविकाराचा झटका येऊन जागीच कोसळला. लागलीच त्याला जवळच्या रुग्णालयात नेले आता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अचानक आलेल्या मृत्यू मुले परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.