VIDEO : संस्कारच ते...! सोनाक्षी- झहीरच्या लग्नात अदिती राव हैदरीच्या होणाऱ्या पतीनं असं काय केलं?

Aditi Rao Hydari Fiancee Siddharth :  सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बालच्या रिसेप्शन पार्टीत अदिती राव हैदरीच्या होणाऱ्या नवऱ्यानं वेधलं सगळ्यांचं लक्ष

दिक्षा पाटील | Updated: Jun 24, 2024, 10:50 AM IST
VIDEO : संस्कारच ते...! सोनाक्षी- झहीरच्या लग्नात अदिती राव हैदरीच्या होणाऱ्या पतीनं असं काय केलं? title=
(Photo Credit : Social Media)

Aditi Rao Hydari Fiancee Siddharth : बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. सोनाक्षी आणि झहीरनं त्यांच्या लग्नाविषयी कोणतीच बातमी शेअर केली नव्हती. अशात त्यांच्या लग्नाला घेऊन खूप उत्सुक आहेत. सोनाक्षी आणि झहीरनं रजिस्टर्ड लग्न केलं आणि त्यानंतर सगळ्यांसाठी रिसेप्शन पार्टी ठेवली. यावेळी सोनाक्षीची 'हीरामंडी' सह-कलाकार अदिती राव हैदरी तिच्या होणाऱ्या नवऱ्यासोबत म्हणजेच अभिनेता सिद्धार्थसोबत दिसली. यावेळी सिद्धार्थनं रेखा यांना पाहताच असं काही केलं की सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. 

सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत सिद्धार्थ, रेखा आणि अदिती हे तिघंही दिसत आहेत. सिद्धार्थ आणि अदितीनं रेखा यांच्यासोबत पापाराझींना पोझ दिले. पापाराझींना पोझ दिल्यानंतर स्टेजवरून उतरण्याआधी सिद्धार्थनं रेखा यांचा आशीर्वाद घेतला. त्यानंतर पापाराझी आता पुढचं लग्न तुमचं असं बोलताना दिसत आहेत. खरंतर सिद्धार्थचा हा आशीर्वाद घेत असतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चाहते सिद्धार्थ आणि रेखा यांच्या या व्हिडीओला पसंती देत आहेत. त्याशिवाय कमेंट देखील करत आहेत. तर हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी सिद्धार्थच्या संस्कारांची स्तुती करत आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला 'काय संस्कार आहेत.' तर अनेकांनी कमेंट करत रेखा यांची स्तुती केली आहे. 

सिद्धार्थ आणि अदिती यांची भेट 2021 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'महा समुंद्रम' या चित्रपटाच्या सेटवर झाली. इथेच त्या दोघांमध्ये मैत्री झाली आणि पुढे मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. अदिती आणि सिद्धार्थनं यंदाच्या वर्षी 27 मार्च रोजी अचानक साखरपुडा करत चाहत्यांना सुखद धक्का दिला. मात्र, या कपलनं अजून त्यांच्या लग्नाविषयी कोणतीही माहिती दिलेली नाही. सिद्धार्थ आणि अदितीनं एका प्रायव्हेट सेरेमनीमध्ये एका मंदिरात साखरपुडा केला. 

हेही वाचा : कबूल है! सोनाक्षी-इक्बालच्या लग्नाचा पहिला फोटो समोर

दरम्यान, काही दिवसांपूर्वी सिद्धार्थ आणि अदिती राव हैदरी हे एका ट्रिपवर गेले होते. त्यांनी या ट्रिपमधील अनेक रोमॅन्टिक फोटो शेअर केले होते. सोनाक्षी आणि झहीरच्या लग्नानंतर आता नेटकरी त्यांच्या लग्नाची आतुरतेनं प्रतिक्षा करत आहेत.