Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

20 Feb 2024, 22:25 वाजता

विराट-अनुष्काला पुत्ररत्नाचा लाभ

 

Virat Kohli, Anushka Sharma blessed with baby boy : विराटच्या घरी दुस-यांदा पाळणा हललाय... विराट कोहली आणि अनुष्का शर्मा दुस-यांदा आई-बाबा बनले आहेत.. अनुष्का शर्माने गोंडस मुलाला जन्म दिलाय.. विराट कोहलीनेच सोशल मीडियावरुन ही गोड बातमी दिलीय.. याआधी दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्सनेही यासंदर्भात गोड बातमी दिली होती. मात्र त्यानंतर त्याने यू-टर्न घेतला होता. .आता मात्र विराटने सोशल मीडियावरुन स्वत:ची याची घोषणा केलीय.. विराट कोहली आणि अनुष्का शर्माचा विवाह 2018 मध्ये झाला होता. त्यांना वामिका नावाची मुलगी आहे, जीचा जन्म 2021 मध्ये झालाय..

बातमीचा व्हिडीओ पाहा-

20 Feb 2024, 21:55 वाजता

भाजपच्या मंचावर मनसेचे बाळा नांदगावकर

 

Bala Nandgaonkar : राज्यात भाजप आणि मनसे युती होणार का याची चर्चा पुन्हा सुरु झालीय.. कारण मनसेचे नेते आज थेट भाजपच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते... मनसे नेते बाळा नांदगावकर तसंच नितीन सरदेसाई आज धन्यवाद देवेंद्रजी या भाजपच्या कार्यक्रमात उपस्थित राहिले होते... गृहनिर्माण सोसायटींच्या वर्षानुवर्षांच्या समस्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नामुळे सुटल्याने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.. मात्र कालच आशिष शेलार आणि राज ठाकरेंची भेट झाली होती.. त्यानंतर आता मनसे नेते थेट देवेंद्र फडणवीसांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेत.. त्यामुळे भाजप आणि मनसे युतीच्या दिशेने वाटचाल करतायत का याचीच चर्चा आता सुरु झालीय...

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

20 Feb 2024, 20:10 वाजता

मराठांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम सुरू- राज ठाकरे

 

Raj Thackeray on Maratha Reservation : निवडणुकीच्या तोंडावर मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम सुरू असल्याची प्रतिक्रिया राज ठाकरेंनी दिलीय. मराठा विधेयक मंजूर झाल्याचा आनंद आहे मात्र समाजानं जागरुक रहावं असा इशारा त्यांनी दिलाय. तसंच राज्य सरकारला आरक्षणाचे अधिकार आहेत का? असा सवालही राज ठाकरेंनी विचारलाय.

बातमीचा व्हिडीओ पाहा-

20 Feb 2024, 19:42 वाजता

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची तारीख जाहीर

 

Maharashtra Assembly Budget Session : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची तारीख जाहीर... 26 फेब्रुवारी ते 1 मार्च दरम्यान अधिवेशन...कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय..

बातमीचा व्हिडीओ पाहा-

20 Feb 2024, 19:08 वाजता

 अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते मराठा आरक्षणाला आव्हान देणार

 

Gunaratna Sadavarte on Maratha Reservation : विधानसभेत मंजूर करण्यात आलेल्या मराठा आरक्षण विधेयकाला अॅड. गुणरत्न सदावर्ते कोर्टात आव्हान देणार आहेत. लवकरच सदावर्तेंच्या बाजूनं कोर्टात याचिका दाखल करण्यात येईल. विधानसभेत मंजूर झालेलं मराठा आरक्षण बेकायदेशीर असल्याची भूमिका सदावर्तेंनी मांडलीय.न्यायमूर्ती शुक्रे यांचा अहवाल सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निकषांच्या विरुद्ध आहे असा दावाही सदावर्तेंनी केलाय.. मराठा आरक्षणाविरोधात सदावर्ते उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत.. 

20 Feb 2024, 18:40 वाजता

चंदीगड महापौरप्रकरणी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

 

Chandigarh Mayor Poll : चंदीगड महापौर प्रकरणी सुप्रीम कोर्टानं मोठा निर्णय दिलाय. महापौरपदी आपचे उमेदवार कुलदीप कुमार यांची निवड सुप्रीम कोर्टानं वैध ठरवली आहे. ज्या 8 मतांवरून वाद निर्माण झाला होता ती मतं वैध ठरवावीत असे निर्देश सुप्रीम कोर्टानं दिलेत. सुनावणीदरम्यान सरन्यायाधीशांनी स्वतः या 8 मतपत्रिका तपासल्या. त्यानंतर वादग्रस्त निवडणूक अधिकाऱ्यांनं दिलेला निकाल बाद ठरवला. त्यामुळे अखेर चंदीगड महापालिका आपच्या ताब्यात आलीय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

20 Feb 2024, 18:02 वाजता

शाहू महाराजांच्या उमेदवारीबाबत माहित नाही- शरद पवार

 

Sharad Pawar Live | Marathi News LIVE Today : शाहू महाराजांच्या उमेदवारीबाबत माहित नाही...कोल्हापूरच्या जागेबाबत एकटा निर्माण घेऊ शकत नाही.....मराठा आरक्षणाचं कोर्टात काय होईल सांगता येत नाही...आमच्या सरकारच्या काळात सुप्रीम कोर्टानं नाकारलं..शरद पवार यांचं वक्तव्य

बातमीचा व्हिडीओ पाहा-

20 Feb 2024, 17:10 वाजता

'राज्यात कुणबीकरण सुरू, खोटे सर्टिफिकीट वाटप', छगन भुजबळांचा आरोप

 

Chhagan Bhujbal  Live | Marathi News LIVE Today :  मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नको...कुणबीकरणाला आमचा तीव्र विरोध...राज्यात कुणबीकरण सुरू, खोटे सर्टिफिकीट वाटप... छगन भुजबळ यांचा राज्य सरकारवर आरोप..

 

20 Feb 2024, 17:02 वाजता

छत्रपती शाहू महाराज लोकसभा लढणार?

 

Sharad Pawar visiting Chhatrapati Shahu Maharaj : शरद पवार छत्रपती शाहू महाराजांच्या भेटीसाठी आले आहेत. कोल्हापुरातल्या न्यू पॅलेसवर ही भेट होतीय. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट अतिशय महत्वपूर्ण मानली जातीय. शरद पवार गटाकडून शाहू महाराजांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जाणार अशा चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहेत. त्यातच आता शरद पवार शाहू महाराजांच्या भेटीसाठी आल्यानं जाणकारांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

20 Feb 2024, 16:27 वाजता

मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा- देवेंद्र फडणवीस

 

Devendra Fadnavis Live | Marathi News LIVE Today : 'मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत 10%आरक्षण','दोन्ही सभागृहात विधेयक एकमताने मंजूर', 'मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा','ओबीसी आरक्षणाला धक्का नाही', उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

बातमीचा व्हिडीओ पाहा-