Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

20 Feb 2024, 10:24 वाजता

धाराशिवमध्ये मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल

 

Dharashiv Maratha Protest : धाराशिवमध्ये मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत... बैलांचा छळ आणि चक्काजाम केल्याचा आरोप करीत सांजा आणि येडशी येथील 200 पेक्षा अधिक आंदोलकावर गुन्हे नोंदवण्यात आलेत.. बैलगाड्या आणि ट्रॅक्टर रस्त्यावर उभे करुन चक्का जाम करणं.. बैलांना डांबरी रस्त्यावर तीन दिवस उन्हात बांधून ठेवणं.. त्यांना वेदना होतील असा छळ करणं.. असे आरोप या आंदोलकांवर ठेवण्यात आलेत.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

20 Feb 2024, 09:38 वाजता

पुण्यात 100 कोटीहून जास्त किमतीचं ड्रग्ज जप्त

 

Pune Drugs Seized : पुणे ड्रग्ज प्रकरणी मोठी माहिती उघड झालीये.. पुण्यात जप्त करण्यात आलेल्या 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीचं ड्रग्सचं आंतरराष्ट्रीय कनेक्शन उघड झालंय. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं 52 किलोपेक्षा अधिक मेफेड्रॉन जप्त केलंय.. विश्रांतवाडी भागात छापा टाकून अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. धक्कादायक म्हणजे संशय येऊ नये म्हणून मिठाच्या पॅकमध्ये पावडर टाकून त्याची विक्री करण्यात येत होती.. हे ड्रग्ज मुंबईला पाठवलं जाणार होतं.. या ड्रग्जची विक्री देशातील विविध भागात तसंच परदेशात होणार होती.. याप्रकरणी सोमवारी पुणे पोलिसांनी तिघांना अटक केलीय.वैभव माने, अजय कारोसिया, हैदर शेख अशी या तिघांची नावं आहेत..  हे ड्रग्ज पॉल आणि ब्राऊन या मुंबईतील ड्रग्ज पेडलर्सकडे पाठवलं जाणार होतं.. 

बातमी पाहा - Pune News : पुणे पोलिसांची धडक कारवाई; 100 कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमतीचे ड्रग्स जप्त

20 Feb 2024, 09:30 वाजता

माजी खासदार संजय निरुपम भाजपच्या वाटेवर?

 

Sanjay Nirupam : काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा आहेत. निरुपम अनेक दिवसांपासून काँग्रेसमध्ये नाराज असल्याची चर्चा रंगली होती. त्यात ते आता भाजपत प्रवेश करणार असल्याचं सूत्रांकडून समजतंय. मुंबईत भाजपकडून काँग्रेसला पुन्हा एकदा धक्का देण्याचा हा प्रयत्न मानला जातोय..

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

20 Feb 2024, 08:54 वाजता

विशेष अधिवेशनाकडे ओबीसी महासंघाचं लक्ष - तायवाडे

 

Nagpur Babanrao Taiwade : मराठा आरक्षणासाठीच्या अधिवेशनाकडे ओबीसी समाजही लक्ष ठेवून आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का लावण्याचा प्रयत्न झाला तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा ओबीसी महासंघानं दिलाय. तसंच ओबीसी आमदार काय भूमिका घेतात याकडेही लक्ष असल्याचं ओबीसी नेते बबनराव तायवाडेंनी म्हटलंय.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

20 Feb 2024, 08:45 वाजता

लोकसभेसाठी महायुतीच्या नव्या फॉर्म्युलाची चर्चा

 

Loksabha Election 2024 : लोकसभेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती समोर आलीय...महायुतीच्या नव्या फॉर्म्युल्याची चर्चा सुरू असून, 32-12-4 असा फॉर्म्युला ठरल्याचं बोललं जातंय...भाजप 32, शिवसेना 12 आणि राष्ट्रवादी 4 जागांवर प्राथमिक चर्चा सुरू आहे...या जागावाटपाबाबत अंतिम निर्णय दिल्लीतून होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

20 Feb 2024, 08:25 वाजता

सगे-सोयरे मागणीवर मनोज जरांगे ठाम

 

Manoj Jarange Patil : आजच्या अधिवेशनातच सगेसोय-यांबाबतच्या कायद्याची अंमलबजावणी करावी...नाहीतर मराठ्यांची नाराजी सरकारला परवडणार नाही असा इशाराच जरांगेंनी दिलाय...आम्ही मागत असलेलं ओबीसीतूनच आरक्षण द्या...त्यासाठी मराठा आमदार आणि मंत्र्यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी आवाज उठवावा...आणि जो आमदार आवाज उठवणार नाही तो विरोधी समजला जाईल...असं जरांगेंनी म्हटलंय...तर 2 ते 3 जणांचं ऐकून मराठ्यांचं वाटोळं करू नका...सगे सोयरे विषय अधिवेशनाच्या सुरूवातीच पटलावर घ्या...नाहीतर उद्यापासून शांततेत आंदोलन करू असा इशारा जरांगेंनी दिलाय...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

20 Feb 2024, 07:39 वाजता

गायकवाडांच्या केबल ऑफिसची तोडफोड

 

Ganpat Gaikwad : भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या भावाच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आलीय.. आमदार गायकवाड गोळीबारप्रकरण ताज असतानाच त्यांच्या भावाच्या ऑफिसची काहींनी तोडफोड केलीय.. कल्याण पूर्वच्या तिसाई परिसरात भाजप आमदार गणपत गायकवाड यांचे बंधू अभिमन्यू गायकवाड यांचं केबलचं ऑफिस आहे. या केबल कार्यालयात कार आणि टू व्हीलरवरुन पाच ते सहाजण आले आणि त्यांनी केबल कार्यालयात घुसून कर्मचा-यांना मारहाण केली. कार्यालयाची तोडफोड केली. याप्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.. हा हल्ला राजकीय वैमनस्यातून किंवा व्यावसायिक वादातून झालाय का याचा तपास सुरु आहे.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

20 Feb 2024, 07:32 वाजता

मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन

 

Vidhimandal Special Session For Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी आजचा दिवस सर्वात महत्त्वाचा आहे. कारण मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने आज विशेष अधिवेशन बोलावलंय... मात्र या विशेष अधिवेशनात सरकारने काढलेल्या सगेसोयरेंच्या कुणबी नोंदी संदर्भातील अधिसुचनेचा मुद्दा येण्याची शक्यता कमीच असल्याचं दिसतंय.. सामाजिक न्याय विभागाकडे मराठा आरक्षणाबाबत तब्बल साडे चार लाख हरकती आल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.. सध्या सामाजिक न्याय विभागाकडून आलेल्या हरकतींबाबत अभ्यास सूरू आहे.. लवकरच याबाबतचा अहवाल सरकारला सादर करण्यात येणार आहे. हरकती नोंदवण्यासाठी सरकारकडून अधिकचा वेळ देण्यात आल्यामुळे विरोधक सध्या या मुद्द्यावर बोलणार नसल्याची माहिती मिळतेय.. त्यामुळे आजच्या अधिवेशनात हरकतींवर चर्चा होण्याची शक्यता कमीच दिसतेय..

बातमीचा व्हिडीओ पाहा -