Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

20 Feb 2024, 16:04 वाजता

मतांसाठी मराठा समाजाला फसवं आरक्षण- विजय  वडेट्टीवार

 

Vijay Wadettiwar : लोकसभा निवडणुकीत मतं घेण्यासाठी सरकारने फसवणूक केलीय असा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी केलाय...मराठा समाजाच्या हितासाठी हे सरकार नाही...दोन वेळा मराठा आरक्षण टिकलं नाही...आणि आता तिस-या वेळीही कायद्याच्या निकषात टिकणारं हे आरक्षण नाही, असा आरोप वडेट्टीवारांनी केलाय...मात्र, कायद्याच्या नियमात राहिल असं हे विधेयक असल्याचा दावा अजित पवारांनी केलाय..

बातमीचा व्हिडीओ पाहा-

20 Feb 2024, 15:12 वाजता

मराठा आरक्षण विधेयक विधानसभेत एकमतानं मंजूर 

 

Maratha Reservation : मराठा आरक्षण विधेयक विधानसभेत एकमतानं मंजूर झालाय. त्यामुळे मराठा समाजाला 10% आरक्षण मिळणारंय. मराठा समाजाला कायद्यात टिकणारं आरक्षण मिळेल अशी ग्वाही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिदेंनी दिलीय. या आरक्षणामुळे ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. मराठा समाजाला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केल्याचं आपल्याला समाधान असल्याचं शिंदेंनी म्हंटलंय. 

20 Feb 2024, 14:37 वाजता

मनोज जरांगे पाटील आंदोलनावर ठाम

 

Manoj Jarange Patil : सरकारनं मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर झालं असलं तरी मनोज जरांगे मात्र आंदोलनावर ठाम आहेत. या विधेयकानं मराठा समाजाचं कल्याण होणार नाही आम्हाला आमच्या हक्काचं ओबीसी आरक्षणच द्या, या मागणीवर जरांगे ठाम आहेत. सगेसोय-यांच्या अंमलबजावणीसाठी जरांगे आग्रही आहेत. आपलं आंदोलन सुरूच राहिल अशी घोषणाही त्यांनी केलीय. सरकारचा निषेध म्हणून त्यांनी सलाईनही काढून टाकले. आता पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी त्यांनी उद्या मराठा बांधवांची अंतरवाली सराटीत बैठकही बोलावलीय.

 

20 Feb 2024, 13:58 वाजता

मराठा आरक्षण विधेयकाचा प्रस्ताव विधानसभेत एकमतानं मंजूर

 

Chief Minister Eknath Shinde : मराठा आरक्षण विधेयकाचा प्रस्ताव विधानसभेत एकमताने मंजूर झालाय. मराठा समाजाला कायद्यात टिकणारं आरक्षण मिळेल अशी ग्वाही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिदेंनी दिलीय. या आरक्षणामुळे ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. मराठा समाजाला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केल्याचं आपल्याला समाधान असल्याचं शिंदेंनी म्हंटलंय. 

20 Feb 2024, 13:28 वाजता

मराठा आरक्षणावर मुख्यमंत्र्यांचं निवेदन

 

Eknath Shinde LIVE : मराठा आरक्षण विधेयक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विधानसभेत मांडलं. मराठा आरक्षण विधेयकाचा प्रस्ताव विधानसभेत एकमतानं मंजूर करण्यात आलाय. मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत आरक्षण देण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विधानसभेत केली. तसंच ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही आणि ओबीसींवर कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही असं आश्वासन शिंदेंनी विधानसभेत दिलं. 

20 Feb 2024, 12:33 वाजता

मविआचं मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांना पत्र

 

MVA Meeting Update : मराठा आरक्षणासंदर्भात महाविकास आघाडीने मुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष, विधान परिषद उपसभापती यांना पत्र लिहिलंय...या विशेष अधिवेशनाबाबत कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली नसल्यामुळे आरक्षणाबाबत स्पष्टता देण्याची मागणी करण्यात आलीय...यात मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसेल असे आरक्षण कसे देणार?...ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण कसे देणार?...सगेसोयरे अधिसूचना बाबत स्पष्टता द्या अशी मागणी मविआने केलीय...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

20 Feb 2024, 12:05 वाजता

भाजप अध्यक्ष जे.पी.नड्डा उद्या मुंबई दौऱ्यावर

 

J.P.Nadda Visit Mumbai : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा उद्या मुंबई दौ-यावर आहेत. मुंबईतील 3 लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचं उद्या संमेलन असेल. संध्याकाळी 6 वाजता अंधेरीत कार्यकर्त्यांना नड्डा मार्गदर्शन करतील. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलारांची प्रमुख उपस्थिती असेल. उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबईतील कार्यकर्त्यांना भाजप संबोधित करणार आहे.. 

20 Feb 2024, 11:25 वाजता

सरकारनं मराठ्यांची फसवणूक केली - मनोज जरांगे

 

Manoj Jarange Patil : सरकारनं मराठ्यांची फसवणूक केल्याचा आरोप जरांगे पाटलांनी केलाय. आम्ही वेगळ्या आरक्षणाची मागणी केली नव्हती. आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण हवंय असं जरांगे म्हणालेत. सग्यासोय-यांच्या कायद्याची अंमलबजावणी करायची नव्हती तर अधिवेशन कशाला बोलावलं असा सवाल उपस्थित केलाय. कायद्याची अंमलबजावणी करा अन्यथा उद्यापासून पुन्हा आंदोलन करू असा इशारा जरांगेंनी सरकारला दिलाय. 

बातमी पाहा -  'आम्हाला दुसरं ताट का देता? ओबीसीतूनच आरक्षण हवं' मनोज जरांगेंची मागणी

20 Feb 2024, 10:51 वाजता

मराठा आरक्षण अहवालाला कॅबिनेटमध्ये मंजुरी

 

Cabinet Meeting : मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत 10% आरक्षण देण्यासंबंधी अहवालाला मंजुरी मिळालीय..  मराठा समाजाला राजकीय आरक्षण नसेल असंही अहवालात नमूद करण्यात आलंय.. मराठा आरक्षण विशेष अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरु आहे. मराठा आरक्षण अधिसूचना मसुदा, हरकतींवर बैठकीत चर्चा होतेय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

20 Feb 2024, 10:31 वाजता

रोहित पवारांनी घेतली अजितदादांची जागा?

 

Rohit Pawar : राष्ट्रवादी फुटल्यानंतर आता अजित पवारांची जागा शरद पवारांचे नातू आणि आमदार रोहित पवारांनी घेतल्याची चर्चा आहे.. कारण ठरलंय मंचर-कळंब इथली बॅनरबाजी.. वादा तोच पण दादा नवा अशी टॅगलाईन घेत रोहित पवारांच्या समर्थनार्थ पुणे-नाशिक महामार्गावर बॅनरबाजी करण्यात आलीय. उद्या शरद पवारांची मंचर इथे सभा आहे. या सभेसाठी मी येतोय असा संदेश एकीकडे दिला जातोय तर दुसरीकडे अजित पवारांची जागा रोहित पवारांनी घेतल्याचा संदेशही देण्या आलाय.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा -