Terrorist attack on Army Vehicle : जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात दहशतवादी हल्ला

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Terrorist attack on Army Vehicle : जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात दहशतवादी हल्ला

21 Dec 2023, 22:50 वाजता

लष्कराच्या गाडीवर दहशतवाद्यांचा गोळीबार, 4 जवान शहीद

 

Terrorist attack on Army Vehicle : जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात दहशतवादी हल्ला झाला आहे. दहशतवाद्यांनी भारतीय लष्कराच्या ट्रकवर आज गोळीबार केलाय.. या हल्ल्यामध्ये 4 जवान शहीद झालेत. तर 3 जवान जखमी आहेत. दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी सुरक्षा दलाची अतिरिक्त कुमक घटनास्थळी पाठवण्यात आलेत. घटनास्थळी दहशतवादी आणि लष्कराची चकमक सुरू आहे. 

बातमीचा व्हिडीओ पाहा -

 

21 Dec 2023, 20:31 वाजता

ऑलिम्पिकपटू साक्षीचा नाराजीतून निवृत्तीचा निर्णय

 

Sakshi Malik Retire : ऑलिम्पिकविजेती कुस्तीपटू साक्षी मलिकने निवृत्तीची घोषणा केलीय. त्यामुळे क्रिडाविश्वात खळबळ उडालीय. खरंतर रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या नव्या अध्यक्षनिवडीच्या निषेधार्थ साक्षी मलिकनं निवृत्ती जाहीर केलीय. निवृत्तीची घोषणा करताना भर पत्रकार परिषदेत साक्षीनं आपले बुट टेबलवर ठेवत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिलीय. नवे अध्यक्ष हे लैंगिक छळाचे आरोप करण्यात आलेल्या बृजभूषण सिंह यांचे व्यावसायिक भागीदार असल्याचा आरोप साक्षीनं केला. त्यामुळे आपल्याला निवृत्तीशिवाय पर्याय नसल्याचं सांगत ती रडत रडत पत्रकार परिषदेतून बाहेर पडली. कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्याविरोधात साक्षी मलिकसह अनेक कुस्तीपटूंनी वर्षभर आंदोलन केलं. त्यांना हटवल्यानंतर निवडणुका घेण्यात आल्या. आणि संजय सिंह यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. दरम्यान आपल्याला साक्षीशी काही देणं घेणं नसल्याची प्रतिक्रिया बृजभूषण सिंह यांनी दिलीय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा -

 

21 Dec 2023, 17:54 वाजता

मनोज जरांगे आणि सरकारची आजची चर्चा निष्फळ

 

Govt. delegation visits Jarange : जरांगे आणि मंत्र्यांच्या शिष्टमंडळातील चर्चा निष्फळ.. रक्ताच्या नात्याच्या व्याखेवरून तिढा.. 24 डिसेंबरच्या मुदतीवर जरांगे ठाम... सरकारसमोर जरांगेंचं मन वळवण्याचं आव्हान कायम...
मराठा आंदोलकांना नोटीस बजावणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करा, अशी मागणी मनोज जरांगेंनी केलीये.  मोर्चाबाबत कुठलीही अधिकृत घोषणा केली नसतानाही आधीच नोटीस कशा बजावल्या असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. मुंबईत लागू केलेल्या जमावबंदीवरुनही जरांगेंनी सरकारवर निशाणा साधलाय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा -

 

21 Dec 2023, 17:49 वाजता

अजून थोडा वेळ देण्याची शिष्टमंडळाची मागणी, जरांगे 24 डिसेंबरच्या डेडलाईनवर ठाम

 

Govt. delegation visits Jarange : मंत्र्यांच्या शिष्टमंडळाची जरांगेंशी चर्चा...रक्ताच्या नात्याच्या व्याखेवरून तिढा वाढला...पत्नी आणि आईच्या नात्यातल्यांनाही प्रमाणपत्र देण्याची जरांगेंची मागणी...महाजनांनी दर्शवली असमर्थता. मनोज जरांगे 24 डिसेंबरच्या डेडलाईवर ठाम आहेत. 24 डिसेंबरपर्यंत सरकार आरक्षण देईल, असं जरांगेंनी म्हटलंय. आम्ही आमच्या शब्दावर ठाम आहोत, आता सरकारनं शब्द पाळावा, असं जरांगेंनी सांगितलंय. जरांगेंनी 24 तारखेचा हट्ट धरू नये, ही विनंती करण्यासाठी सरकारच्या शिष्टमंडळानं जरांगेंची अंतरवाली सराटीमध्ये भेट घेतली. 

बातमीचा व्हिडीओ पाहा -

 

21 Dec 2023, 16:31 वाजता

रक्तातील सग्या-सोयऱ्यांना आरक्षणाचं ठरलं होतं - जरांगे

 

Govt. delegation visits Jarange : सरकारचं शिष्टमंडळ अंतरवाली सराटीत मनोज जरांगेंच्या भेटीला... गिरीश महाजन, सांदीपान भुमरे, उदय सामंत, चिवटे जरांगेंच्या भेटीला.. 24 डिसेंबरची डेडलाईन वाढवून देण्याची सरकारच्या शिष्टमंडळची जरांगेंना विनंती. मागेल त्या मराठ्याला आरक्षण द्या- जरांगेंची मागणी.. वडिलांशिवाय आत्या, मामाला आरक्षण देण्याची जरांगेंची मागणी.. रक्तातील सग्या-सोयऱ्यांना आरक्षणाचं ठरलं होतं असा जरांगेंचा दावा.. तर पत्नी, आई, मामा रक्ताच्या नात्यात येत नाहीत असं गिरीश महाजन यांचं वक्तव्य... पत्नीच्या कुटुंबाला आरक्षण कसं देता येणार? असा सवालही महाजन यांनी केलाय. जे लिहिलं आहे, त्यावर ठाम असल्याची जरांगेंची भूमिका.

 

21 Dec 2023, 14:12 वाजता

कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळं BMC अलर्ट

 

BMC Alert : कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे मुंबई महापालिका अलर्ट झालीय. महापालिकेनं कोरोना आढावा बैठक घेतलीय. आरोग्य व्यवस्थेला आरटीपीसीआर टेस्ट वाढवण्याच्या, ऑक्सिजन बेड्स, आयसीयू आणि इतर यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश देण्यात आलेत.  मुंबईत सद्यस्थितीला कोरोनाचे १७ अ‍ॅक्टीव्ह रुग्ण आहेत. आज एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळलाय....

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

21 Dec 2023, 14:08 वाजता

राज्यात भाजप एकटीच लढेल - जितेंद्र आव्हाड

 

Jitendra Awhad : राज्यात भाजप स्वबळावर लढणार असा खळबळजनक दावा शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी केलाय.. आव्हाडांच्या या विधानाने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडालीय... नागपूरमध्ये भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बैठकीत हे धोरण ठरल्याचा दावा आव्हाडांनी केलाय.. ज्यांना भाजपसोबत निवडणूक लढवायची आहे, त्यांनी कमळावर निवडणूक लढवावी असंही ठरवण्यात आल्याचं आव्हाडांनी म्हटलंय.. तर ज्यांच्या आरोप किंवा डाग आहेत त्यांना सोबत न घेण्याचंही ठरल्याचा दावा आव्हाडांनी केलाय. तर भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी मात्र आव्हाडांचा हा दावा फेटाळून लावलाय.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

21 Dec 2023, 13:59 वाजता

संसदेची सुरक्षा आता CISFच्या ताब्यात

 

Sansad Security CISF : संसदेच्या सुरक्षेची जबाबदारी आता CISF च्या ताब्यात देण्यात आलीय.. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल आता संसदेची सुरक्षा करेल... केंद्रीय गृह मंत्रालयाच्या नुकत्याच झालेल्या एका बैठकीत यावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय... त्यासोबतच संसदेची सुरक्षेसाठी सर्व्हे करणार असल्याचीही माहिती समोर येतेय.. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल देशातल्या अनेक महत्त्वाच्या वास्तूंना संरक्षण पुरवतं.. मुंबईसह देशातली अनेक विमानतळं, भाभा अणू संशोधन केंद्र तसंच अणू उर्जा प्रकल्प, शिर्डीचं साई मंदिर, दिल्ली मेट्रो अशा महत्त्वाच्या ठिकाणी CISF सुरक्षा पुरवते...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

21 Dec 2023, 13:03 वाजता

उद्धव ठाकरेंना राम मंदिराचं निमंत्रण देणार नाहीत - राऊत

 

Sanjay Raut : राम मंदिराच्या आंदोलनात योगदान असणा-यांना सरकार निमंत्रण देणार नाही. ज्यांचं काहीही योगदान नाही अशांचा अयोध्येत सोहळा रंगणार असल्याची टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केलीय.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

21 Dec 2023, 12:17 वाजता

मराठा समाजाला चिथवू नका - मनोज जरांगे

 

Manoj Jarange Patil : मराठा आंदोलकांना नोटिसा बजावणा-या पोलीस अधिका-यांना निलंबित करा, अशी मागणी मनोज जरांगेंनी केलीये.  मोर्चाबाबत कुठलीही अधिकृत घोषणा केली नसतानाही आधीच नोटीसा कशा बजावल्या असा सवाल त्यांनी उपस्थीत केलाय.. मुंबईत लागू केलेल्या जमावबंदीवरुनही त्यांनी सरकावर टीका केलीये....

बातमीचा व्हिडीओ पाहा -