Terrorist attack on Army Vehicle : जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात दहशतवादी हल्ला

Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Terrorist attack on Army Vehicle : जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात दहशतवादी हल्ला

21 Dec 2023, 12:15 वाजता

निवडणुकीच्या तोंडावर मराठा समाजाला लॉलीपॉप - विजय वडेट्टीवार

 

Vijay Wadettiwar On Maratha Reservation : निवडणुकीच्या तोंडावर मराठा समाजाला सरकारनं लॉलीपॉप दिल्याची टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी केलीय. फेब्रुवारीत अधिवेशनाची घोषणा केली खरी मात्र तोपर्यंत आचारसंहिता लागेल आणि त्यामुळे आरक्षण प्रश्न मार्गी लागणार नसल्याची टीका वडेट्टीवारांनी केलीय

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

21 Dec 2023, 11:59 वाजता

सोशल मीडिया 'X'चं सर्व्हर क्रॅश

 

'X' Server Crash : सोशल मीडियावरचं एक्स म्हणजेच पुर्वीचं ट्विटर बंद पडलंय... एक्सचा सर्व्हर क्रॅश झाल्यामुळे त्याची सेवा बंद झालीय... भारतात आठ शहरांमध्ये एक्सची सेवा ठप्प झालीय.. मुंबई, दिल्ली, बंगळुरु, हैदराबादसारख्या शहरांमध्ये एक्सची सेवा विस्कळीत झाल्याचं समजतंय.. भारतासह अनेक देशांमध्ये युझर्सना एक्स वापरण्यासाठी समस्या येतायत..  एक्सची टाईमलाईन दिसत नसल्याची तक्रार अनेकांनी केलीय..

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

21 Dec 2023, 10:45 वाजता

मराठा आंदोलनात ट्रॅक्टर वापरण्यास विरोध

 

Nanded Tractor : मराठा आंदोलनादरम्यान ट्रॅक्टरचा वापर करण्यास नांदेड पोलिसांनी बंदी घातलीये.. नांदेडच्या कंधार पोलिसांनी ट्रॅक्टर चालकांना यासंदर्भात नोटीस बजावलीये.. ट्रॅक्टरचा वापर आंदोलनात, सभेत न करता केवळ शेतीच्या कामासाठी करा असं नोटीसमधून सांगण्यात आलंय.. ट्रॅक्टरचा वापर जर आंदोलनादरम्यान केल्यास कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलिसांनी दिलाय.. 24 डिसेंबरला मुंबईत मराठा समाजाचा मोर्चा काढण्यात येणार आहे... या मोर्चात मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टरचा वापर होण्याची शक्यता आहे.. ट्रॅक्टरच्या वापरामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ शकतो त्यामुळे पोलिसांनी या नोटीसा बजावल्यात.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

21 Dec 2023, 10:42 वाजता

'पोपट दे, घटस्फोट घे'

 

Pune Parrot : पुण्यात घटस्फोटाचं एक विचित्र प्रकरण समोर आलंय.. पुण्यातील एका पतीनं पत्नीला घटस्फोट देण्यासाठी एक  विचित्र अट घातलीये.. घटस्फोट हवा असेल तर गिफ्ट म्हणून दिलेला आफ्रिकन पोपट परत दे तरच घटस्फोट देईल असं या पतीनं कौटुंबिक न्यायालयात सांगीतलंय..  2019मध्ये या दोघांचं लग्न झालं होतं.. मात्र त्यांच्यात मतभेद होत असल्यानं दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.. प्रकरण कौटुंबिक कोर्टात गेल्यांनतर घटस्फोट देण्यासाठी पतीनं ही विचित्र अट घातली.. सुरुवातीला पत्नी पोपट देण्यास तयार नव्हती... शेवटी तीनं पोपट परत करणयाचं मान्य केल्यानंतर घटस्फोटाचं प्रकरण मंजूर झालं..

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

21 Dec 2023, 10:29 वाजता

अजित पवार गटाची उद्या महत्त्वाची बैठक

 

Ajit Pawar Camp Meet : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गट कामाला लागलाय. उद्या सकाळी बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. सकाळी 10 पासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत बैठका घेण्यात येणारेत. अजित पवार, सुनील तटकरेंच्या उपस्थितीत या बैठका होणारेत. या बैठकीला प्रदेश नेते, पदाधिकारी,  उपस्थित राहणारेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी करण्याबाबत या बैठकीत चर्चा होणारेय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

21 Dec 2023, 09:42 वाजता

पुणे गारठलं, पाषाणमध्ये सर्वात कमी 10° अंश तापमान

 

Pune Cold : पुणे शहर गारठलंय.. पुण्यात यंदाच्या हिवाळ्यातील निचांकी किमान तापमानाची नोंद काल झाली.. शिवाजीनगरमध्ये किमान तापमान 12 अंश सेल्सियस नोंदवण्यात आलं.. तर सर्वांत कमी तापमान पाषाणमध्ये 10° अंश सेल्सिअस होतं.. हवेतला गारठा वाढल्यामुळे रात्री थंडीतही वाढ झालीय.. पुढच्या दोन दिवसात पुणे शहरासह जिल्ह्यातही गारठा वाढेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय.. किमान तापमानाचा पारा 11 अंश सेल्सियसपर्यंत घसरण्याचा अंदाज आहे.. उत्तर भारतातून येणा-या थंड वा-याच्या प्रभावामुळे पुणे शहरात गारठा वाढतोय..

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

21 Dec 2023, 08:56 वाजता

आयपीसी, सीआरपीसी कायद्यात मोठे बदल

 

IPC & CRPC Law : भारतीय दंड विधान म्हणजेच आयपीसी आणि सीआरपीसी कायद्यात मोठे बदल करण्यात आले आहेत.. लोकसभेत यासंदर्भातली तीन विधेयकं आवाजी बहुमताने मंजूर करण्यात आली.. नवीन कायद्यानुसार तक्रार मिळाल्यानंतर तीन दिवसांत गुन्हा दाखल करावा लागेल... तेव्हा आता तारीख पे तारीख असा प्रकार होणार नसल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी म्हटलंय...  खूनाचे कलम आता 302 नाही तर 101 होईल.. मॉब लिचिंगसाठी फाशीची तरतूद करण्यात आली आहे.. राजद्रोह कायद्याची जागा आता देशद्रोह कायदा घेणार आहे.. शिक्षेऐवजी आता न्याय देण्याला प्राधान्य असेल असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी म्हटलंय..

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

21 Dec 2023, 08:53 वाजता

मुंबईत 18 जानेवारीपर्यंत जमावबंदीचे आदेश

 

Mumbai Jamavbandi : मुंबईमध्ये महिनाभर जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आलेत. शहरात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी जमावबंदीचे आदेश जारी केलेत. त्यानुसार कालपासून 18 जानेवारीपर्यंत हे आदेश लागू असतील. जाहीर सभा घेण्यावरही या काळात बंदी घालण्यात आलीय. जमावबंदीच्या कालावधीत शहरात लाऊडस्पीकर, बँड आणि फटाके फोडण्यावरही बंदी असेल. या आदेशाचे उल्लंघन करणा-यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा पोलिसांकडून देण्यात आलाय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

21 Dec 2023, 07:50 वाजता

राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव

 

Maharashtra Corona : राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय. गेल्या काही दिवसांत राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय. केरळनंतर राज्यात सतर्कता बाळगण्यात येत असली तरी काल 14 रुग्णांचं निदान झालंय. मुंबईत 13 तर ठाण्यात एक रुग्ण आढळलाय. याचं प्रमुख कारण म्हणजे जेएन 1 हा नव्यानं आलेला व्हेरियंट असल्याचं बोललं जातंय. यासंबंधी केंद्राकडून राज्यातील आरोग्य मंत्र्यांची बैठक घेण्यात आली. घाबरण्याचं कारण नसलं तरी सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्यायत. कोरोनापासून वाचण्यासाठी नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी मास्क लावणे, समांतर अंतर ठेवणे आणि सॅनिटायझरचा वापर करावा असा सल्ला डॉक्टर देतायत. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

21 Dec 2023, 07:29 वाजता

कोरोनाचा उपप्रकार JN.1चा राज्यात शिरकाव

 

Corona : कोरोना व्हायरसचा नवीन उपप्रकार जेएन 1 चा राज्यातील पहिला रुग्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळलाय. हा रुग्ण 41 वर्षांचा पुरुष आहे. या पार्श्वभूमीवर सर्व जिल्ह्यांना दक्षता घेण्याच्या सूचना आरोग्य विभागानं केल्यायत. याचबरोबर कोरोना टेस्ट वाढविण्याचे निर्देशही देण्यात आलेत. कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याच्या शक्यतेमुळे राज्यातील आरोग्य व्यवस्थेच्या सज्जतेचाही आढावा घेण्यात आलाय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा -