27 Dec 2023, 22:28 वाजता
'परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र नंबर 1', उपमुख्यमंत्री फडणवीसांची माहिती
Devendra Fadnavis : परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र नंबर 1 असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी X या सोशल मीडियावरून केलीय. एप्रिल ते सप्टेंबर 2023 या 6 महिन्यांच्या कालावधीत राज्यात 65 हजार 502 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली.. कर्नाटक, दिल्ली आणि गुजरातपेक्षा झालेल्या एकत्रित गुंतवणुकीपेक्षा महाराष्ट्रात जास्त FDI आल्याचा दावा फडणवीसांनी केलाय... 2022-23 या गेल्या आर्थिक वर्षात 1 लाख 18 हजार 422 कोटींची परकीय गुंतवणूक झाली होती. आता यंदाच्या वर्षातही परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्रानं अव्वल नंबर कायम ठेवलाय.
27 Dec 2023, 20:01 वाजता
दिल्लीत 2 दिवसांनी इंडिया आघाडीची बैठक होणार
Mukul Wasnik : दिल्लीत दोन दिवसांनी इंडिया आघाडीची बैठक होणार आहे.. आतापर्यंत इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल हे अद्याप जाहीर करण्यात आलेलं नाहीये. दरम्यान दिल्लीत होणा-या बैठकीतही पंतप्रधानपदाच्या उमेदवाराबाबत चर्चा होणार नाही अशी माहिती काँग्रेस नेते मुकुल वासनिक यांनी दिलीय.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
27 Dec 2023, 19:35 वाजता
पुण्यात महायुतीत ठिणगी?
Pune Mahayuti : पुण्यात महायुतीत ठिणगी पडलीय.अजित पवार पुण्याचे पालकमंत्री झाल्यानंतर विकासनिधी मिळत नसल्याचा भाजप आणि शिंदे गटाचा आरोप आहे. भाजप आणि शिंदे गटाच्या या नेत्यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्याकडे अजित पवारांची तक्रार केलीय. तब्बल 800 कोटींचा विकास निधी अजित पवारांनी मंजूर केलाय. हा 800 कोटी रुपयांचा निधी तात्काळ रद्द करण्यात यावा अन्यथा कोर्टात जाण्याचा इशारा देण्यात आलाय.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
27 Dec 2023, 18:40 वाजता
राज्यात कोरोनाचा नवा व्हेरियंट JN 1चे 10 रुग्ण
Corona JN 1 in State : राज्यात कोरोनाचा नवा व्हेरियंट JN 1 चे १० रुग्ण झालेत. आज राज्यात ३७ नवीन रुग्णांचं निदान झालं. तर राज्यात आज दोन करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. JN1 व्हेरियंटचे १० रुग्ण सापडलेत. ठाण्यात ५, पुण्यात ३, सिंधुदुर्गात १ तर अकोल्यात नव्या व्हेरियंटचा एक रुग्ण सापडलाय.
27 Dec 2023, 18:13 वाजता
अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्षांना नव्या गाड्यांचं मिळणार गिफ्ट
Ajit Pawar Group : अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्षांना नव्या कोऱ्या गाड्या गिफ्ट दिलंय. जिल्हाध्यक्षांसाठी नव्या 40 गाड्या मुंबईत दाखल झालेत. सर्व जिल्हाध्यक्षांना नव्या गाड्या मिळणार. मुंबईतील पक्षकार्यालयाबाहेर गाड्यांची टेस्ट ड्राईव्ह.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
27 Dec 2023, 17:45 वाजता
Sharad Pawar Live | Marathi News LIVE Today : 'राममंदिर उभारल्याचा आनंद','बाबरी पाडल्याचं जबाबदारी केवळ बाळासाहेबांनी घेतली','राममंदिर उभारणीत अनेकांचं योगदान','नाना पाटेकर निवडणूक लढवण्याबाबत ऐकलेलं नाही', शरद पवार यांचं वक्तव्य.
27 Dec 2023, 17:08 वाजता
कोल्हापूरात अनधिकृत मशिदीवर महापालिकेची कारवाई
Kolhapur | Action On Illegal Masjid : कोल्हापूरात अनधिकृत मशिदीवर कारवाई करण्यात आलीय. लक्षतीर्थ वसाहत भागातल्या अनधिकृत मशिद आणि मदरसावर महापालिकेनं कारवाई केलीय. लक्षतीर्थ वसाहतीत अनधिकृत मशीद आणि मदरसा उभारल्याचा महापालिकेला संशय आहे. प्रचंड पोलीस बंदोबस्तात मशीद आणि मदरसाचा पंचनामा करण्यात आला.महापालिका अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांनी पंचनामा करून मशीद आणि मदरसाला टाळं ठोकलंय.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
27 Dec 2023, 16:35 वाजता
ऑनर किलिंग रोखण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
Honour killing : ऑनर किलिंगसारखे गुन्हे रोखण्यासाठी राज्य सरकार लवकरच पोलीस बंदोबस्त असलेली सुरक्षागृहे उभारणार आहे... सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार, हरयाणा आणि उत्तर प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही आता अशी सुरक्षागृहे उभारली जाणार आहेत. आंतरजातीय तसंच आंतरधर्मीय विवाह करणा-या जोडप्यांना याठिकाणी निवासासोबत पोलीस सुरक्षा उपलब्ध केली जाणाराय.. परिस्थितीचं गांभीर्य ओळखून सुमारे वर्षभर याठिकाणी जोडप्यांना राहता येईल. या सेवेसाठी नाममात्र शुल्क आकारलं जाणाराय... गृह खात्याच्या या निर्णयाचं जात पंचायत मूठमाती अभियान या संस्थेनं स्वागत केलंय...
27 Dec 2023, 16:05 वाजता
उद्धव ठाकरेंना राममंदिर सोहळ्याचं निमंत्रण?
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे आणि अखिलेश यादव यांना रामलल्ला प्राण प्रतिष्ठाचे निमंत्रण पाठवल्याची सूत्रांची माहिती मिळतेय.
27 Dec 2023, 15:48 वाजता
पुण्यात तब्बल 10 सिलेंडरचा स्फोट
Pune Cylinder Blast : पुण्याच्या विमानतळ परिसरात बेकायदा सिलेंडर साठ्याचा स्फोट झाला. एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत हे सिलेंडर ठेवण्यात आले होते. सिंबोयसेस कॉलेजजवळ, रोहन मिथिला इमारतीलगत सिलेंडरच स्फोट झालाय. त्यापैकी 10 सिलेंडरचा स्फोट झाला.अजूनही त्या ठिकाणी 50 सिलेंडर आहेत. सिलेंडरचा स्फोट होऊन त्या ठिकाणी आग लागलीय.