27 Dec 2023, 15:08 वाजता
माधुरी दीक्षित निवडणूक लढवणार?
Madhuri Dixit : माधुरी दीक्षित निवडणूक लढवणार का? तर माधुरी म्हणते राजकारण नको रे बाबा...माधुरी बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आहे. माधुरीने आपल्या अभिनयासह नृत्य आणि सौंदर्याने चाहत्यांना वेड लावलं आहे. माधुरी दीक्षित निर्मित 'पंचक' (Panchak) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. दरम्यान बॉलिवूडची 'धक धक गर्ल' माधुरी दीक्षितने डॉ श्रीराम नेनेंसोबत झी २४ तासच्या लीडर्स या विशेष कार्यक्रमात हजेरी लावली. या कार्यक्रमात तिने राजकारणात एन्ट्री करणार का? याबद्दल खुलासा केला आहे. काय म्हणाली माधुरी पाहा...
बातमीचा व्हिडीओ पाहा-
27 Dec 2023, 14:03 वाजता
कोरोनानं पुन्हा सर्वांची चिंता वाढवलीये
Corona JN.1 Varient : कोरोनानं पुन्हा सर्वांची चिंता वाढवलीये.. कोरोनाचा नवा व्हॅरियंट JN.1ची लागण झालेल्या रुग्णांची संख्या आता 100 पार गेलीय. देशात 26 डिसेंबरपर्यंत 109 रुग्ण आढळून आलेत. त्यापैकी सर्वाधिक 36 रुग्ण गुजरातमधले आहेत तर कर्नाटकात 34 रुग्ण आहेत. महाराष्ट्रात JN.1चे 9 रुग्ण झालेत. दरम्यान गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे 529 नवे रुग्ण आढळून आले असून तिघांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय..यात कर्नाटकमधील दोघांचा तर गुजरातमधील एका रुग्णाचा समावेश आहे.. नव्यानं आढळून आलेल्या रुग्णांसह देशातील कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आता चार हजारांहून अधिक झालीये. सुट्ट्या आणि नव्या वर्षाचं सेलिब्रेशन यामुळे गर्दीच्या ठिकाणी कोरोनाचा प्रसार झपाट्यानं होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता आणखीन वाढलीये.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
27 Dec 2023, 13:59 वाजता
पुण्यातील निधीवाटपावरुन महायुतीत ठिणगी
Pune Mahayuti : पुण्यात महायुतीत ठिणगी पडलीय. अजित पवार पुण्याचे पालकमंत्री झाल्यानंतर विकासनिधी मिळत नसल्याचा भाजप आणि शिंदे गटाचा आरोप आहे. भाजप आणि शिंदे गटाच्या या नेत्यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्याकडे अजित पवारांची तक्रार केलीय. तब्बल 800 कोटींचा विकास निधी अजित पवारांनी मंजूर केलाय. हा 800 कोटी रुपयांचा निधी तात्काळ रद्द करण्यात यावा अन्यथा कोर्टात जाण्याचा इशारा देण्यात आलाय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
27 Dec 2023, 12:57 वाजता
देशात कोरोनाचे 529 नवे रुग्ण, 3 मृत्यू
India Corona : कोरोनानं पुन्हा सर्वांची चिंता वाढवलीये.. गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे 529 नवे रुग्ण आढळून आले असून तिघांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय..यात कर्नाटकमधील दोघांचा तर गुजरातमधील एका रुग्णाचा समावेश आहे.. नव्यानं आढळून आलेल्या रुग्णांसह देशातील कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आता चार हजारांहून अधिक झालीये. सुट्ट्या आणि नव्या वर्षाचं सेलिब्रेशन यामुळे गर्दीच्या ठिकाणी कोरोनाचा प्रसार झपाट्यानं होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता आणखीन वाढलीये.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
27 Dec 2023, 12:44 वाजता
लोकसभेसाठी काँग्रेसचं 'है तैयार हम'
Nagpur Congress Rally : काँग्रेस नागपुरातून लोकसभा निवडणुकीचा बिगुल फुंकणारेय. उद्या काँग्रेस पक्षाच्या 138व्या स्थापना दिनानिमित्त नागपुरात सभा होतेय. त्यासाठी गांधी कुटुंब व्यासपीठावर एकत्र येणारेय. पक्षाध्यक्ष खरगेंसह सोनिया गांधी, राहुल आणि प्रियंका गांधींसह काँग्रेसचे बडे नेते या महारॅलीला उपस्थित राहणार असल्याची माहिती विजय वडेट्टीवारांनी दिलीय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
27 Dec 2023, 12:23 वाजता
बच्चू कडू महायुतीतून बाहेर पडणार?
Sharad Pawar Meet Bachchu Kadu : राज्याच्या राजकारणातली सर्वात मोठी बातमी... बच्चू कडू महायुती सोडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय... राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज आणि उद्या अमरावती दौऱ्यावर आहेत.. याच दौ-यात शरद पवार आणि बच्चू कडूंची त्यांच्या निवासस्थानी भेट होणार आहे.. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पवार बच्चू कडू यांची भेट घेणार असल्याने चर्चांना उधाण आलंय.. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत बच्चू कडू उमेदवार देणार आहेत.. कडू यांचे निकटवर्तीय रवींद्र वैद्य प्रहारचे उमेदवार असण्याची दाट शक्यता आहे.. त्याच पार्श्वभूमीवर ही भेट होणार असली तरी बच्चू कडू काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
27 Dec 2023, 12:06 वाजता
OBC विद्यार्थ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय
OBC Student : राज्यातल्या ओबीसी विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलाय.. ओबीसी विद्यार्थ्यांसाठी आता इंग्रजी आणि विज्ञान या विषयांसाठी शिक्षक मिळणार आहेत.. 141 खाजगी अनुदानित उच्च माध्यमिक आश्रमशाळांसाठी 282 शिक्षकांची पदे मंजूर करण्यात आली आहेत.. इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावेंनी हा निर्णय घेतलाय...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
27 Dec 2023, 11:59 वाजता
गोळ्या घातल्या तरी माघार नाही - मनोज जरांगे
Manoj Jarange : मराठा आरक्षणावरुन मनोज जरांगेंनी राज्य सरकारला आता निर्वाणीचा इशारा दिलाय... गोळ्या जरी घातल्या तरी आता आरक्षणाशिवाय माघार नाही असा थेट इशारा जरांगेंनी दिलाय... सरकार मराठा आरक्षण देत नसल्याने नाईलाजाने मुंबईत यावंच लागेल... आणि आता मराठा आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही असाही इशारा जरांगेंनी दिलाय..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
27 Dec 2023, 11:24 वाजता
खासदार संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Sanjay Raut On BJP : भाजप म्हणजे पळपुटे रणछोडदास असल्याचा हल्लाबोल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केलाय.. देशातील कोणत्याही साहसी लढ्यात भाजपचा सहभाग नसल्याचा आरोपही संजय राऊतांनी केलाय..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
27 Dec 2023, 11:20 वाजता
राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा टप्पा जाहीर
Rahul Gandhi Bharat Jodo Yatra : राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेबाबत सर्वात मोठी बातमी.. भारत जोडो यात्रेचा पुढचा टप्पा आता जाहीर झालाय... राहुल गांधींच्या भारत न्याय यात्रेची सुरुवात मणिपूरपासून होईल... तर या यात्रेचा समारोप मुंबईत होणार आहे.. 14 जानेवारी ते 20 मार्च दरम्यान राहुल गांधींची ही भारत जोडो यात्रा असेल... एकूण 6 हजार 200 किलोमीटरची ही यात्रा असेल.. मणिपूर, नागालँड, बिहार, उत्तर प्रदेश या राज्यांमधून प्रवास करत ही यात्रा महाराष्ट्रात दाखल होईल.. राहुल गांधींच्या याआधीच्या भारत जोडो यात्रेतही महाराष्ट्राचा समावेश होता..
बातमीचा व्हिडीओ पाहा -