1 Jan 2024, 12:49 वाजता
नव्या वर्षामध्ये अनेक आर्थिक नियम बदलणार
New Year New Rules : नवीन वर्ष सुरु झालंय.. मात्र आता नव्या वर्षामध्ये अनेक आर्थिक नियमसुद्धा बदलणार आहेत... त्याचा परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावरही होऊ शकतो.. आजपासून ज्या युपीआय आयडीवर एक वर्षापासून कोणताच व्यवहार झाला नाही, ती खाती बंद होतील. तसंच आता यूपीआयद्वारे आजपासून शेअर खरेदीही शक्य होणार आहे.. मात्र ही सुविधा सुरुवातीला ठराविक ग्राहकांनाच मिळणार आहे... सिम खरेदीसाठीच्या नियमांमध्येही बदल करण्यात आले आहेत.. तसंच अनेक मोठ्या कारच्या किंमतीमध्येही वाढ होणार आहे...
31 Dec 2023, 23:38 वाजता
हाँगकाँगमध्ये नव वर्ष 2024चं अत्यंत दिमाखात आणि जल्लोषात स्वागत
Hong Kong New Year Celebration : संपूर्ण जगाचं आकर्षणाचं केंद्र असलेल्या हाँगकाँगमध्ये नव वर्ष 2024चं अत्यंत दिमाखात आणि जल्लोषात स्वागत करण्यात आलं. फटाक्यांच्या नयनरम्य आतषबाजीत यावेळी सरत्या वर्षाला निरोप दिला गेला. संपूर्ण परिसर फटाक्यांच्या लखलखाटामुळे उजळून निघालेला पाहायला मिळाला.
31 Dec 2023, 22:15 वाजता
ऑस्ट्रेलियामध्ये नयनरम्य आतषबाजीत नव्या वर्षाचं स्वागत
Australia New Year Celebration : ऑस्ट्रेलियात मोठ्या उत्साहात न्यू इअरचं स्वागत करण्यात आलंय. सिडनीमधल्या पर्ल हार्बर ब्रिजवर नयनरम्य अशी आतषबाजी करण्यात आली. बरोब्बर रात्री 12 वाजता सिडनीचं आकाश रंगीबेरंगी रंगांनी उजळलं. सिडनी शहरात या आतषबाजीचा लखलखाट होता.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
31 Dec 2023, 21:40 वाजता
विद्यमान मुख्य सचिव मनोज सौनिक निवृत्त, नितीन करीर यांची नियुक्ती
Chief Secretary of the State : राज्याच्या मुख्य सचिवपदी नितीन करीर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान मुख्य सचिव मनोज सौनिक आज निवृत्त झाले. त्यांच्या जागी करीर यांची नियुक्ती करण्यात आली. ते 1988च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत. प्रदिर्घ प्रशासकीय कारकिर्दीचा अनुभव असलेले नितीन करीर यांनी वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, तसंच महसूल, नगरविकास यासारख्या महत्त्वाच्या विभागांच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदाची जबाबदारी सांभाळली आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
31 Dec 2023, 20:35 वाजता
रजनीश शेठ यांच्याकडून पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार फणसळकरांकडे
Director General of Police : राज्याच्या पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार विवेक फणसळकरांकडे सोपवण्यात आला आहे. रजनीश शेठ यांच्याकडून फणसळकरांनी पदभार स्वीकारला. पोलीस महासंचालक पदावरुन रजनीश शेठ निवृत्त झाले. त्यामुळे मुंबईचे पोलीस आयुक्त असलेल्या फणसळकर यांच्याकडे महासंचालक पदाचा अतिरिक्त पदभार देण्यात आलाय.
31 Dec 2023, 17:33 वाजता
न्यूझीलंडमध्ये नयनरम्य आतषबाजीत नव्या वर्षाचं स्वागत
Newzealand New Year Celebration : न्यूझीलंडमध्ये रंगीबेरंगी आतषबाजीत नव्या वर्षाचं स्वागत करण्यात आलं. न्यूझीलंडच्या ऑकलंड या राजधानीत रात्री 12 वाजता आतषबाजी करण्यात आली. 2023 ला निरोप देत 2024 वर्षाचं उत्साहात स्वागत करण्यात आलं. डोळे दिपवणारी ही आतषबाजी होती.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
31 Dec 2023, 14:07 वाजता
'हवा तेज चल रही है, पैजामे संभालो',संजय शिरसाटांची राऊतांवर टीका
Sanjay Shirsat on Sanjay Raut : हवा तेज चल रही है, पैजामे संभालो अशा शब्दांत शिंदे गटाने संजय राऊतांवर पलटवार केलाय.. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना डिवचलं होतं.. आमच्या पाडापाडीत पडाल तर तुम्हीच पडाल असा थेट इशाराच संजय राऊतांनी काल पुण्यातून अजित पवारांना दिला होता
बातमीचा व्हिडीओ पाहा-
31 Dec 2023, 13:09 वाजता
महाराष्ट्रातून 17 प्रकल्प बाहेर गेलेत- संजय राऊत
Sanjay Raut : महाराष्ट्रातून 17 प्रकल्प बाहेर गेलेयत...मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री खोटे आकडे देतायत...दहशतीखाली उद्योगपतींना गुजरातला घेऊन चाललेयत...मुंबई, महाराष्ट्राची वाट लावण्याचे धोरण सरकार करतंय... सिंधुदुर्गातून प्रकल्प गुजरातला गेला त्यावर नारायण राणे, शिंदेंनी बोलावं...राणे शिवसैनिक असल्याचं सांगतात मग त्यांनी आपला बाणा दाखवावा असं आव्हान राऊतांनी दिलंय...
बातमीचा व्हिडीओ पाहा-
31 Dec 2023, 12:34 वाजता
पाणबुडी प्रकल्प गुजरातला जाणार?
Vaibhav Naik : सिंधुदुर्गातील प्रस्तावित असलेला पाणबुडी प्रकल्प गुजरातला जाणार असल्याचा आरोप ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईकांनी केलाय...पाणबुडी प्रकल्प पद्धतशीरपणे गुजरातला नेल्याचा केंद्राचा डाव असून, तीन मंत्री सिंधुदुर्गातील असताना प्रकल्प जाणं म्हणजे महाराष्ट्राशी गद्दारी असल्याचं नाईकांनी म्हटलंय...तर हा प्रकल्प राज्याचा असून, बाहेर जाणार नाही...अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलीय...
31 Dec 2023, 12:12 वाजता
राज्यात 24 तासांमध्ये कोरोनाचे 134 नव्या रुग्णांची नोंद
Corona Update : नवीन वर्षाचं स्वागत करताना काळजी घ्या... कारण राज्यातली कोरोनाची वाढ मोठ्या प्रमाणात होताना दिसतेय... गेल्या 24 तासांमध्ये राज्यात कोरोनाचे 134 नवे रुग्ण आढळले आहेत.. देशात गेल्या 24 तासांमध्ये सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आढळले आहेत.. महाराष्ट्रापाठोपाठ कर्नाटक दुस-या क्रमांकावर आहे. कर्नाटकात 131 नवे रुग्ण आढळलेत.. तर बिहार, कर्नाटक आणि केरळमध्ये कोरोनामुळे प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झालाय. तेव्हा आज थर्टी फर्स्ट साजरा करताना कोरोनाचे नियम पाळण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय..
बातमीचा व्हिडीओ पाहा-