31 Dec 2023, 11:46 वाजता
'जयंत पाटलांमुळे मंत्रिमंडळ विस्तार रखडला', संजय शिरसाटांचा गौप्यस्फोट
Sanjay Shirsat on Jayant Patil : राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार रखडल्यावरुन सर्वात मोठा गौप्यस्फोट शिंदे गटाकडून करण्यात आलाय... शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे अजित पवारांसोबत सत्तेत येणार होते.. जयंत पाटील यांच्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार रखडला असा मोठा खुलासा शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी केलाय.. पुण्यात त्यांनी हा प्रस्ताव दिला होता त्या बैठकीला सुप्रिया सुळेही हजर होत्या असा दावाही संजय शिरसाट यांनी केलाय.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
31 Dec 2023, 11:30 वाजता
'फोटोसेशन नाही, स्वच्छता मिशन', मुख्यमंत्री शिंदेंची आदित्य ठाकरेंवर टीका
Eknath Shinde on Aaditya Thackeray : स्वच्छता अभियानावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आदित्य ठाकरेंवर पुन्हा टीका केलीये.. स्वच्छता अभियानावर काही लोकं टीका करतात मात्र हे फोटोसेशन नाही तर स्वच्छता मिशन आहे असं मुख्यमंत्री म्हणालेत.. राज्यभर हे अभियान राबवणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं..
बातमीचा व्हिडीओ पाहा-
31 Dec 2023, 11:09 वाजता
ठाण्यातील कासारवडवलीत रेव्ह पार्टी पोलिसांनी उधळली, 100 जण ताब्यात
Police Action on Rave Party in Thane : 31 डिसेंबरला ठाणे पोलिसांनी मोठी कारवाई केलीय.. घोडबंदरजवळ पोलिसांनी रेव्ह पार्टी उधळून लावलीय.. पार्टीत धाड टाकून पोलिसांनी 100 जणांना ताब्यात घेतलंय.. ठाण्यातल्या घोडबंदर कासारवडवली गावाच्या लगत ही रेव्ह पार्टी सुरु होती.. मात्र पोलिसांनी कारवाई करत मद्यधुंद आणि नशेत धुंद असलेल्या तरुणांना ताब्यात घेतलंय. तसंच 25 मोटारसायकलही जप्त करण्यात आले आहेत.. एमडी, चरस, गांजा, अल्कोहोल असे विविध अंमली पदार्थ या पार्टीत वापरले होते... मात्र पोलिसांनी ही रेव्ह पार्टी उधळून लावली... ठाणे गुन्हे शाखा युनिट पाच आणि युनिट दोन यांनी संयुक्तरित्या मिळून ही कारवाई केली..
बातमीचा व्हिडीओ पाहा-
31 Dec 2023, 10:39 वाजता
शरद पवार 3 दिवस शिर्डी दौऱ्यावर
Sharad Pawar : नव्या वर्षात शरद पवार तीन दिवस शिर्डी दौ-यावर जाणार आहेत.. 2 ते 4 जानेवारी दरम्यान त्यांचा शिर्डी दौरा असेल.. या दौ-यादरम्यान ते आरपीआय आठवले गटाचे उपाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याला उपस्थित राहतील.. तसंच 3 आणि 4 जानेवारीला शिर्डीत शरद पवार गटाचे अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनात पवार कार्यकर्ते आणि पदाधिका-यांमा मार्गदर्शन करतील..
बातमीचा व्हिडीओ पाहा-
31 Dec 2023, 10:27 वाजता
इम्रान खान यांना पाकिस्तान निवडणूक आयोगाचा दणका
Pakistan Election Commission Rejects Imran Khan Application : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी निवडणूक आयोगानं मोठा धक्का दिलाय. पीटीआय पक्षाचे अध्यक्ष इम्रान इम्रान यांचा निवडणूक अर्ज निवडणूक आयोगानं फेटाळलाय. त्यामुळे आगामी 8 फेब्रुवारीला होणारी सार्वत्रिक निवडणूक इम्रान यांना लढवता येणार नाही. सध्या भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली जेलमध्ये असलेल्या इम्रान यांनी मियाँवली या मतदार संघातून अर्ज भरला होता. या निर्णयामुळे पाकिस्तानची सत्ता उलथवून लावण्याचं इम्रान यांचं स्वप्न धुळीस मिळालंय.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
31 Dec 2023, 09:36 वाजता
बदलापुरात हॉटेलमध्ये पैशांच्या वादातून तुफान राडा, 3 जण जखमी
Badlapur Rada : बदलापूर शहरात एका हॉटेलमध्ये ग्राहक आणि हॉटेल कर्मचा-यांमध्ये राडा झालाय. पैशांच्या वादातून जोरदार हाणामारी झाली...बियरचे पैसे जास्तीचे घेतल्यानं ग्राहकांनी हॉटेल मालकाशी वाद घातला. त्यानंतर त्यांच्यात हाणामारी झाली. यात तीन जण जखमी झालेत. जखमीमध्ये हॉटेल मॅनेजरचा समावेश आहे. हाणामारीची घटना सीसीटीव्हीत चित्रित झालीय. बदलापूर पूर्व भागातील शुभम हॉटेलमध्ये हा प्रकार घडलाय. या प्रकरणी बदलापूर पोलीस ठाण्यात परस्परांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आलेयत.
31 Dec 2023, 09:02 वाजता
नववर्षानिमित्त साई मंदिरात भाविकांची गर्दी
Shirdi Sai Baba Temple : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीत भाविकांची गर्दी झालीये.. लाखो साईभक्त शिर्डीत दाखल झालेत.. सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्यात.. भाविकांसाठी आज रात्रभर साईमंदिर खुलं ठेवण्यात येणार आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
31 Dec 2023, 08:32 वाजता
उद्यापासून राज्यातील रेशन दुकानदार संपावर
Ration shopkeepers Strike : उद्यापासून राज्यातील रेशन दुकानदारांनी बेमुदत संप पुकारलाय.. विविध प्रलंबित मागण्यासांठी हा संप पुकारण्यात आलाय. या संपात पुण्यासह राज्यातील सर्व रेशन दुकानदारांनी सहभाग घेतलाय. मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत कोणत्याही धान्याची उचल आणि वितरण न करण्याचा निर्णय रेशन दुकानदारांच्या संघटनेनं घेतलाय. या संपामुळे नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच गरीबांना फटका बसण्याची शक्यता आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
31 Dec 2023, 08:03 वाजता
भारतीय क्रिकेट संघाला धक्का, शार्दुल ठाकूर दुखापतग्रस्त
Shardul Thakur Injured : भारतीय क्रिकेट संघाला धक्का बसलाय...अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूर दुखापतग्रस्त झालाय.. नेट प्रॅक्टीस दरम्यान शार्दुलच्या खांद्याला बॉल लागलाय. त्यामुळे तो दक्षिण आफ्रिकेसोबतची दुसरी कसोटी खेळणार का याबाबत संभ्रम आहे... पहिल्या कसोटी सामन्यात त्याला संधी देण्यात आली होती. मात्र या सामन्यात बॅटिंगदरम्यान त्याच्या डोक्याला बॉल लागला होता. मात्र तरिही त्यानं बॅटिंगचा निर्णय कायम ठेवला.. दुस-या कसोटीचा सराव करताना आता त्याच्या खांद्याला बॉल लागलाय.. त्यामुळे त्याची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. त्यानंतरच तो खेळण्यासाठी फीट आहे का हे कळेल...
बातमीचा व्हिडीओ पाहा-
31 Dec 2023, 07:35 वाजता
संभाजीनगरमध्ये अज्ञात वाहनानं 3 जणांना चिरडलं
Sambhajinagar Accident : संभाजीनगरमध्ये एका अज्ञात वाहनानं तिघांना चिरडलंय.. यात दोघांचा जागीच मृत्यू झालाय तर एक गंभीर जखमी झालाय.. करमाड-पिंप्रीराजा मार्गावरील मंगरूळ फाट्यावर ही दुर्घटना घडलीये.. दोन दुचाकी स्वारांचा या मार्गावर अपघात झाला, त्यावेळी मागून येणा-या भरधाव वाहनानं रस्त्यावर पडलेल्या दुचाकीस्वारांना चिरडलं आणि घटनास्थळावरुन पळ काढला.. यात दोघं जागीच ठार झाले..
बातमीचा व्हिडीओ पाहा-