Maharashtra Players Satkar : महाराष्ट्रातील 4 खेळाडूंचा विधिमंडळात सत्कार

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on JULY 05 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.  

Maharashtra Players Satkar : महाराष्ट्रातील 4 खेळाडूंचा विधिमंडळात सत्कार

5 Jul 2024, 17:44 वाजता

विधिमंडळात रोहित, सूर्यकुमार, जैस्वाल, दुबेचा 1 कोटींचं बक्षीस देऊन सत्कार 

 

Maharashtra Players Satkar : वर्ल्डकप जिंकल्यानंतर टीम इंडियावर कौतुकासह बक्षिसांचाही वर्षाव होतोय. विधानभवनच्या सेंट्रल हॉल इथं रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जैस्वाल या चार खेळाडूंचा भव्य शाही सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते त्यांना गौरवण्यात आलं. या चारही खेळाडूंना राज्य शासनाकडून प्रत्येकी 1 कोटी रुपयांचं बक्षीस देण्यात आलं.. चौघांचंही विधीमंडळात जल्लोषात स्वागत करण्यात आलं. यावेळी रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जैस्वाल यांनी त्यांच्या स्टाईलमध्ये मनोगत व्यक्त केलं... तर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनीही जगज्जेत्या संघाचं कौतुक केलं.

बातमीचा व्हिडीओ पाहा -

 

5 Jul 2024, 14:25 वाजता

'सर्वकाही गुजरात आहे दाखवण्याचा प्रयत्न', गुजरातमधून आणलेल्या बसवरून राऊतांची टीका

 

Sanjay Raut : क्रिकेटर्सच्या स्वागतासाठी गुजरातमधून मागवलेल्या बसवरून राऊतांनी टीका केलीय...सर्वकाही गुजरात आहे हे दाखवण्याचा प्रयत्न होतोय...मुंबईत ओपन बस नसती तर बनवून घेतली असती इतकी मुंबईची क्षमता आहे अशी टीका राऊतांनी केलीय...तर खेळाडूंच्या सेलिब्रेशमुळे विरोधकांच्या पोटात गोळा निर्माण झालाय असा पलटवार प्रताप सरनाईकांनी केलाय...

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

5 Jul 2024, 13:53 वाजता

'दोषी पीक विमा कंपन्यांवर कारवाई करणार', धनंजय मुंडेंचा इशारा

 

Dhananjay Munde : आता बातमी झी 24तासच्या इम्पॅक्टची.. झी 24तासच्या बातमीनंतर आजही विधानसभेत पीक विम्यावरुन विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं.. जळगाव जिल्ह्यातही पीकविमा कंपन्यांनी पात्र असून अनेक दावे फेटाळल्याचा आरोप आमदार संजय सावकारेंनी केलाय.. तर संगनमत करुन विमा उतरवले का याचाही तपास करण्याची मागणी पृथ्वीराज चव्हाणांनी केली.. यावर उत्तर देताना दोषी कंपन्यांवर कारवाई करु असा इशारा धनंजय मुंडेंनी दिलाय..

बातमीचा व्हिडीओ पाहा- 

5 Jul 2024, 13:02 वाजता

आमदार गणेश नाईक अस्वस्थ?

 

Ganesh Naik : नवी मुंबईतील भूखंड विक्री प्रकरणावरून भाजप नेते आणि आमदार गणेश नाईक संतप्त झालेत. विधानसभेमध्ये गणेश नाईक यांचा आक्रमक चेहरा पाहायला मिळाला. विशेष म्हणजे सत्ताधारी भाजपचे आमदार असलेले गणेश नाईक यांनी राज्य सरकारमधले काही अधिकारी आणि सिडकोचे काही अधिकारी भ्रष्ट असल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांच्या शब्दाला काही किंमत आहे का? असा प्रश्न उपस्थित केलाय. एकप्रकारे एकनाथ शिंदेंवरच टीका असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरुय.

बातमीचा व्हिडीओ पाहा-

5 Jul 2024, 12:45 वाजता

दक्षिण कोरियात रोबोटची आत्महत्या

 

South Korea Robot Suicide : तुम्ही एखाद्या व्यक्तीला काही ना काही कारणावरून आत्महत्या केल्याचं अनेकदा ऐकलं असेल. मात्र एखाद्या रोबोटने आत्महत्या केलीये, हे पहिल्यांदाच ऐकत असाल. होय, मात्र हे खरंय. दक्षिण कोरियात चक्क एका रोबोटने आत्महत्या केलीय. कामाच्या वाढत्या ताणाला कंटाळून रोबोटने हे पाऊल उचललंय. जिन्याच्या पाय-यांवरून खाली पाडून रोबोटने स्वत:चं आयुष्य संपवलंय. कर्मचा-यांना तो पाय-यांवर निष्क्रिय अवस्थेत खाली पडल्याचं आढळून आलं. हा रोबो नगर पालिकेच्या कामांमध्ये मदत करायचा. दक्षिण कोरियात 10 कर्मचा-यांमागे एक रोबोट काम करतो. या घटनेचं स्थानिक वृत्तपत्रांनीही वृत्तांकन केलंय.

5 Jul 2024, 12:26 वाजता

पुणे कल्याणीनगर अपघातप्रकरणातील अल्पवयीन आरोपीचा निबंध सादर 

 

Pune Car Accident Case : पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीनं बाल न्यायमंडळात निबंध सादर केलाय... रस्त्यावरील अपघात आणि त्यावरील उपाययोजना या विषयावर आरोपीनं 300 शब्दांचा निबंध सादर केलाय.. या आरोपीची जामीनावर सुटका करण्यासाठी बाल न्याय मंडलानं काही अटी घालून दिल्या होत्या. त्यातील निबंध ही एक अट होती... आता अद्याप दोन अटींची पूर्तता बाकी आहे.. त्यानुसार मुलाला रस्ते सुरक्षा विषयात परिवहन विभागासोबत कामही करावं लागणार आहे. तसंच ससून हॉस्पिटलमध्ये मानसिक समुपदेशन घेणंही अनिवार्य आहे.. त्या दुष्टीनं बाल न्याय मंडळ संबंधित विभागांना पुढील निर्देश देणार आहे.. दुर्घटनेनंतर महिनाभरातच हायकोर्टाच्या आदेशानंतर या मुलाची सुटका करण्यात आलीये. 

5 Jul 2024, 12:04 वाजता

'महायुतीचा उमेदवार अर्ज मागे घेणार नाही', अजित पवारांचं वक्तव्य

 

Ajit Pawar : विधान परिषद निवडणुकीत महायुतीचा उमेदवार अर्ज मागे घेणार नाही...असल्याचं अजित पवारांनी म्हणटंलय..आमचे संख्याबळ योग्य आम्ही ९ उमेदवार ठेवणार...माझ्याकडे दोन उमेदवार जिंकतील इतक्या आमदारांची संख्या पाठिशी, मागे नाही घेणार ...असं अजित पवार म्हणाले. माघारीचा आज शेवटचा दिवस असून दुपारी ३ पर्यंत माघारीची वेळ आहे

5 Jul 2024, 11:30 वाजता

पुण्यातील पर्यटनस्थळांवर जमावबंदीचे आदेश

 

Pune Tourist Place : पुण्यात फिरायला जात असाल तर याकडे लक्ष द्या...पुण्यातील पर्यटनस्थळांवर प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आलेयत...31 जुलैपर्यंत पुणे जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर प्रतिबंधासह जमाबंदी आदेश लागू करण्यात आलेयत...पर्यटनस्थळांवर पाच पेक्षा अधिक लोकांना एकत्रित जमण्यास मज्जाव करण्यात आलाय...जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश केलेयत...त्यामुळे पुणे जिल्ह्यातील ऐतिहासिक वास्तू ,गड, किल्ले ,स्मारक तसेच पर्यटन स्थळांच्या ठिकाणी गर्दी केल्यास कारवाई होऊ शकते...

5 Jul 2024, 11:21 वाजता

संभाजीनगरात उद्धव ठाकरे भाजपला देणार धक्का

 

Sambhajinagar BJP : संभाजीनगरात उद्धव ठाकरे भाजपला धक्का देण्याच्या तयारीत आहेत...सात तारखेला उद्धव ठाकरे संभागीनगरच्या दौ-यावर आहेत...यावेळी भाजपचे अनेक माजी नगरसेवक, पदाधिकारी उद्धव ठाकरे गटाच प्रवेश करणार आहेत...त्यामुळे मंत्री अतुल सावे यांना मोठा धक्का बसणाराय...तर शिंदे गटाचे संजय शिरसाठ यांचीही अडचण वाढणाराय...नगरसेवकांमध्ये उपमहापौर, स्थायी समितीच्या सभापती राहिलेल्या नगरसेवकांचा समावेश...यातील एका नगरसेवकांना गत निवडणुकीमध्ये विधानसभा ही लढवलीय...त्यामुळे भाजपसह शिंदे गटालाही धक्का बसणाराय...

 

5 Jul 2024, 10:59 वाजता

महाराष्ट्रातील 4 खेळाडूंचा आज विधिमंडळात सत्कार

 

Team India : वर्ल्डकप जिंकल्यानंतर टीम इंडियावर कौतुकासह बक्षिसांचाही वर्षाव होतोय. टीम इंडियाच्या विजयी संघाचा भाग असलेल्या महाराष्ट्राच्या 4 खेळाडूंना राज्य सरकारकडून प्रत्येकी 1 कोटी रुपयांचं बक्षीस देण्यात येणारेय. आज विधीमंडळात टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मासह महाराष्ट्रातील 4 खेळाडूंचा सत्कार करण्यात येणारेय. त्यावेळी त्यांना बक्षीसही देण्यात येणारेय. आज दुपारी 4 वाजता विधानभवनच्या सेंट्रल हॉल इथं रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जैस्वाल या चार खेळाडूंचा भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आलाय. या चारही खेळाडूंना राज्य शासनाकडून प्रत्येकी 1 कोटी रुपयांचं बक्षीस देण्यात येणारेय. मुख्यमंत्री ही रक्कम आजी जाहीर करणारेत.