Maharashtra Players Satkar : महाराष्ट्रातील 4 खेळाडूंचा विधिमंडळात सत्कार

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on JULY 05 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.  

Maharashtra Players Satkar : महाराष्ट्रातील 4 खेळाडूंचा विधिमंडळात सत्कार

5 Jul 2024, 10:26 वाजता

गोकुळच्या दूध दरात 2 रुपयांची वाढ

 

Gokul Milk Price : गोकुळ दूध संघाकडून पुणे आणि मुंबई या ठिकाणी गाईच्या विक्री दरामध्ये वाढ..1 जुलैपासून गाईच्या दुधामध्ये प्रति लिटर 2 रुपयांनी केली वाढ...गोकुळ दूध संघाच्या गाईच्या दुधाला पुणे आणि मुंबईमध्ये मोठी मागणी...पुणे आणि मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्रामध्ये विक्री दरात कोणतीही वाढ नाही

5 Jul 2024, 10:07 वाजता

गडचिरोलीत बारशाच्या जेवणातून 28 जणांना विषबाधा 

 

Food poisoning in Gadchiroli : गडचिरोली रोपीनगट्टा गावात बारशाच्या जेवणातून 28 जणांना विषबाधा झालीये...बाधितांमध्ये 5 लहान मुलांचा समावेश आहे... बाधितांमध्ये एका मुलाची प्रकृती गंभीर आहे..मात्र इतर सर्व धोक्याबाहेर आहेत...या घटनेत मांसाहारी जेवणात कुणीतरी मुद्दाम विष टाकल्याचा संशय गावक-यांनी व्यक्त केलाय....याबाबत पुढील तपास पोलीस करतायत..

5 Jul 2024, 09:29 वाजता

'पालखी सोहळ्यात राहुल गांधींनी कॅटवॉक करू नये', रणजितसिंह निंबाळकरांची टीका

 

Ranjit Nimbalkar on Rahul Gandhi : पालखी सोहळ्यात राहुल गांधी येण्यावरून भाजप नेते रणजितसिंह निंबाळकर यांनी टीका केलीय...संतांच्या पालखी सोहळ्यात राहुल गांधी यांनी कॅटवॉक करू नये... दर्शन घ्यायचे असेल तर पालखी मुक्काम ठिकाणी जाऊन दर्शन घ्यावे. असा सल्ला माजी खासदार नाईक निंबाळकर यांनी दिलाय...तर काँग्रेस आणि शरद पवार राजकारणासाठी वारकऱ्यांचा वापर करत आहेत...अशी टीका भाजप नेते माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केलीय...

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

5 Jul 2024, 09:08 वाजता

वि. परिषद निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस

 

Maharashtra Legislative Council Elections : विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे...11 जागांसाठी 14 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेयत...मात्र, अर्ज मागे न घेतल्यास निवडणूक चुरशीची होणाराय...तसंच निवडणुकीत घोडेबाजार होण्याची दाट शक्यताय...महायुतीकडून 9 तर मविआकडून 3 जणांनी अर्ज भरलेयत...तर अपक्ष 2 असे एकूण 14 उमेदवारांनी अर्ज भरलेयत...3 जणांनी अर्ज मागे घेतल्यास निवडणूक बिनविरोध होऊ शकते...

5 Jul 2024, 08:29 वाजता

मरिन ड्राईव्ह परिसरात चपलांचा खच 

 

Team India Parade : मरिन ड्राईव्ह परिसरात क्रिकेट चाहत्यांचा चपलांचा खच पाहायला मिळालाय...महापालिका कर्मचारी चपलांचा जमा करतायत...आतापर्यंत चार छोट्या गाड्या आणि तीन मोठे डंपर भरून जपला जमा झाल्यायत...टीम इंडियाच्या स्वागतासाठी हजारोच्या संख्येने चाहते जमा झाले होते...गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला...यावेळी काहींच्या चपला तुटून पडल्यायत...

5 Jul 2024, 08:06 वाजता

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज महाराष्ट्र दौऱ्यावर

 

Amit Shah on Maharashtra Tour Today : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज महाराष्ट्र दौ-यावर...आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अमित शाह महत्त्वाची बैठक घेणार....बैठकीत सर्व भाजप नेत्यांचा समावेश...बैठकीत विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरणार

बातमीचा व्हिडीओ पाहा-

5 Jul 2024, 07:37 वाजता

'विधानसभेला 288 पाडणार की निवडून आणणार?', विधानसभेबाबत जरांगेंचं मोठं विधान

 

Manoj Jarange : विधानसभा निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांनी मोठं विधान केलंय... विधानसभेला 288 पाडायचे की निवडून आणायचे? याचा निर्णय मराठा समाजाच्या बैठकीत घेतला जाईल, असं वक्तव्य जरांगे पाटलांनी केलंय.. झी २४ तासचे कार्यकारी संपादक कमलेश सुतार यांनी घेतलेल्या EXCLUSIVE मुलाखत जरांगे बोलत होते.

5 Jul 2024, 07:32 वाजता

टीम इंडियाच्या विजयी रॅलीत तुफान गर्दी,  10 जण जखमी

 

Team India Parade : क्रिकेटर्सच्या स्वागतासाठी आलेले 10 जण जखमी झालेयत...स्वागतावेळी गर्दी वाढल्याने गर्दीत अनेकांना श्वास घेण्यास त्रास झाला...रेटारेटी, चेंगराचेंगरी झाल्याने अनेकांना अस्वस्थ वाटू लागलं...त्यामुळे अनेक चाहत्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं...या चाहत्यांच्या चपलाही तुटल्या...रस्त्यावर चपलांचा खच पडलाय, इतक्या मोठ्या प्रमाणात गर्दी होती...नरिमन पॉईंट ते वानखेडे अशी क्रिकेटर्सची रॅली काढण्यात आली....मात्र, गर्दी वाढल्याने अनेकांना त्रास झाला...

बातमीचा व्हिडीओ पाहा-