Maharashtra Breaking News LIVE: फडणवीस सरकारने शनिवारी रात्री अखेर खातेवाटप जाहीर झाले आहे. आज राज्यातील ठळक घडामोडींचा आढावा जाणून घेऊया एका क्लिकवर
22 Dec 2024, 08:11 वाजता
Maharashtra Breaking News LIVE: वनक्षेत्राच्या वाढीत महाराष्ट्र तिसऱ्या स्थानी
देशभरातील वनक्षेत्रात वाढ झाल्याचे समाधानकारक चित्र समोर आले आहे. महत्त्वाचे म्हणजे वनक्षेत्रामध्ये वाढ होणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागला आहे.
22 Dec 2024, 07:32 वाजता
Maharashtra Breaking News LIVE: स्वच्छ नवी मुंबई मॅरेथॉनचे आयोजन
नवी मुंबई महानगरपालिके तर्फे आज स्वच्छ नवी मुंबई मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आलेय. 21, 10 आणि 5 किलोमीटर अशा तीन गटामध्ये ही मॅरेथॉन संपन्न होतेय. स्वच्छतेचा संदेश प्रसारित करत आरोग्याचे महत्व अधोरेखित करण्याच्या दृष्टीने या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आलेय. यामध्ये पाच हजारा पेक्षा अधिक नवी मुंबईकरांसह मनपा आयुक्तांनी देखील सहभाग घेत स्वच्छतेचा संदेश प्रसारित केलाय
22 Dec 2024, 06:52 वाजता
Maharashtra Breaking News LIVE: अलमट्टीच्या उंचीबाबत जलआयोगाला पत्र
कर्नाटक सरकारच्या अलमट्टी धरणाच्या उंची वाढवण्याच्या निर्णयाबाबत लवकरच कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेण्यात येईल,अशी माहिती सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी दिली आहे.तसेच अलमट्टी धरणाच्या उंची वाढवण्याच्या निर्णयाबाबत जल आयोगाला पत्र देण्यात आला असून वाढवण्याचा अधिकार आहे का ? याबाबत देखील माहिती मागविण्यात आल्याचे, खासदार विशाल पाटील यांनी स्पष्ट केलंय.
22 Dec 2024, 06:51 वाजता
Maharashtra Breaking News LIVE: वीकेंडला रायगडचे किनारे गर्दीने फुलले
थर्टीफर्स्ट आणि नववर्ष स्वागताचे वेध सर्वानाच लागले आहेत. तत्पूर्वीच रायगडच्या किनाऱ्यांवर पर्यटकांनी गर्दी करायला सुरुवात केलीय. शनिवार रविवार वीकेंडला रायगडमधील अलिबाग, मुरुड, काशिद, दिवेआगरचे किनारे फुलून गेले आहेत
22 Dec 2024, 06:46 वाजता
Maharashtra Breaking News LIVE: मुंबई -गोवा महामार्गावर धावत्या बसला आग
मुंबई गोवा महामार्गावर कोलाड इथं खाजगी प्रवासी बस जळून खाक झाली. रात्री 12 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने यात कुठलीही जीवीत हानी झाली नाही. मात्र बससह प्रवाशांचे सर्व सामान जळून खाक झाले.