Maharashtra Breaking News LIVE Updates: आशिष शेलार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी दाखल

Maharashtra Breaking News Today LIVE Updates: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे क्षणोक्षणाचे अपडेट्स एकाच क्लिकवर जाणून घ्या...

Maharashtra Breaking News LIVE Updates: आशिष शेलार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी दाखल

8 Jan 2025, 21:09 वाजता

आशिष शेलार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी दाखल

सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला सागर बंगल्यावर दाखल

सकाळीच शेलार यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यातच मनसे बैठकीत मुंबई महानगर पालिका निवडणुकीत आपण भाजपाबरोबर जावे अशी इच्छा अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली होती.

त्यामुळे शेलार यांच्या या दोन्ही बैठका म्हणजे राज ठाकरेंसोबत व आता फडवणीस यांच्यासोबत ही भाजप व मनसे युतीची नांदी तर नाही ना ? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे  

8 Jan 2025, 20:49 वाजता

अशा माणसाला वाचविण्यासाठी..., जितेंद्र आव्हांडांचं वाल्मिक कराडवर पोस्ट

हभप वाल्मिक अण्णा कराड याच्यावर फक्त 22  गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी 7 गुन्हे हे भादंवि 307 चे आहेत. कलम 307  मुंबईच्या भाषेत हाफ मर्डर म्हणून ओळखला जातो. ज्या दुखापतीमुळे मृत्यू होऊ शकतो, अशी दुखापत! जर या 22 गुन्ह्यांची व्यवस्थित चौकशी केली तर आणखी धागेदोरे मिळतील आणि अजून 220 गुन्हे दाखल होतील. असे असूनही या थोर माणसाला कधीही तडीपारीची नोटीस नाही, त्यावर कोणतीही प्रतिबंधात्मक कारवाई नाही . अगदी हा पोलीस स्टेशनला गेला तर पोलीसच उठून उभे रहायचे. परळी विधानसभा मतदारसंघातील सगळेच इन्स्पेक्टर याच्या हाताखालील गुलामच होते अन् वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना हे सर्व माहित होते. 307 सारखे गंभीर गुन्हे ज्या माणसावर आहेत; तो माणूस रक्तपिपासू झालेलाच असतो. अशा माणसाला वाचविण्यासाठी सरकारमधील काही माणसे प्रयत्न करत असतील तर धन्य आहे !

8 Jan 2025, 19:59 वाजता

वाल्मिक कराड खंडणी प्रकरणात मोठी अपडेट

खंडणी प्रकरणात पोलिसांनी आरोपी विष्णू चाटे याचे काही व्हॉईस सॅम्पल पोलिसांनी तपास करण्यासाठी घेतले आहेत. 

विष्णू चाटेचा मोबाईल पोलिसांना सापडला नाहीये. त्याचा तपास सध्या सुरू आहे. 

तपास प्रक्रियेत मदत होण्यासाठी आता विष्णू चाटेचे काही व्हॉईस सॅम्पल घेण्यात आले आहेत आणि आज उशिरा आता वाल्मिक कराडचे सुद्धा व्हॉईस सॅम्पल घेतले जाणार आहेत. 

पवनचक्की प्रकल्प अधिकाऱ्यास दोन कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी विष्णू चाटेचे हे व्हॉईस सॅम्पल सीआयडीकडून घेण्यात आले आहेत. 

यातून आता कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून किती खंडणी मागितली, त्यांच्यात नेमके काय बोलणे झाले, याचा उलगडा या सगळ्यातून होऊ शकतो.

8 Jan 2025, 19:57 वाजता

अजित पवार- अमित शहा यांच्यातील बैठक संपली

अजित पवार, प्रफुल पटेल आणि अमित शहा यांच्यातील बैठक संपली

 जवळपास एक तास चालली बैठक 

बैठकीमध्ये राज्यातील सद्यस्थितीवर चर्चा झाल्याची माहिती 

धनंजय मुंडे यांच्याबाबतही बैठकीत चर्चा झाली सूत्रांची माहिती

8 Jan 2025, 18:11 वाजता

गृह विभागाने गठित केली SIT; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश

- बांगलादेशी आणि रोहिंग्यांना मालेगावात जन्म प्रमाणपत्र देण्याच्या प्रकरणी गृह विभागाने एसआयटी गठीत केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिले आहेत. किरीट सोमय्या यांनी याप्रकरणी आवाज उठवला होता. डीआयजी नाशिक यांच्या अध्यक्षतेत एसआयटीची स्थापना करण्यात आली. एसआयटीमध्ये नाशिक विभागीय सहआयुक्त, अतिरिक्त जिल्हाधिकारी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक या चार सदस्यांचा समावेश आहे. चौकशी करून अहवाल देण्यासह शिफारसी करण्यास सुद्धा सांगितले आहे. 

8 Jan 2025, 16:55 वाजता

पुण्यात तरुणीवर हल्ला करणाऱ्या आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी 

पुणे  - आयटी कंपनीच्या पार्किंग मध्ये तरुणीवर हल्ला करणाऱ्या आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी 

आरोपी कृष्णा कनोजा याला कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी

किती आणि कोणाच्या पैशावर वाद झालाय याचा तपास करण्यासाठी येरवडा पोलिसांनी न्यायालयाकडे सात दिवसांची पोलीस कोटींची मागणी केली होती 

मात्र न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे

8 Jan 2025, 16:06 वाजता

आगामी 15 दिवसांत संघटनेमधे मोठे बदल दिसतील - शरद पवार

शरद पवारांचे युवकांच्या बैठकीत भाष्य 

सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सत्तेत जाणार असल्याबाबतच्या बातम्या केवळ अफवा 

आपण जे सोबत येतील त्यांना घेऊन सत्तेत जाण्यापेक्षा लढणं पसंद करणार 

आगामी 15 दिवसांत संघटनेमधे मोठे बदल आपल्याला पाहिला मिळतील

1999 साली जी आपली परिस्थिती होती तीच आता निर्माण झाली आहे. आता माझ्याकडे देण्यासाठी काही नाही आणि गमावण्यासाठी देखील काही नाही 

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणूनच सामोरे जाणार

8 Jan 2025, 15:15 वाजता

मुंबईत मनसे व भाजप युती संदर्भात चर्चा 

- राज ठाकरेंच्या भेटीनंतर आशिष शेलारांची संघ पदाधिकाऱ्यांसोबत भेट

- भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत पार पडली बैठक

- मुंबईत मनसे व भाजप युती संदर्भात चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती

8 Jan 2025, 14:55 वाजता

खासदार अमर काळे यांचा मोठा दावा

सोनिया दुहान यांच्याकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या 7 खासदारांना संपर्क साधण्यात आला. विरोधात काय करणार, आमच्या पक्षात या अशी चर्चा आमच्या खासदारांसोबत केली. सुप्रिया सुळे यांना मही जेव्हा सांगितलं तेव्हा त्या फक्त हसल्या. आमच्याशी संपर्क केला जातोय ही माहिती त्यांना आधीपासून होती असा दावा अमर काळे यांनी केला आहे. 

8 Jan 2025, 14:13 वाजता

अजित पवार हे पक्षाचे प्रमुख, मात्र...; रोहित पवारांचं सूचक विधान

आमदार रोहित पवार यांनी शरद पवारांच्या पक्षातील खासदारांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीत येण्याची ऑफर आल्याबद्दल भाष्य केलं आहे. "आमच्या आमदारांच्या बाबतीत संपर्क झाला असेल अशी माहिती नाही. दिल्लीत अधिवेशन सुरू असताना खासदारांना संपर्क केला अशी चर्चा आहे. पण आमचे खासदार कुठेही जाणार नाहीत. दादांच्या पक्षतील प्रमुख नेते पवार साहेबांचा आदर करत असावेत. पण तटकरे साहेबांबद्दल मला सांगता येणार नाही. सुनील तटकरे हे व्यक्तिगत भूमिका घेतात. प्रमुख अजित पवार आहेत पक्षाचे मात्र सुनील तटकरे यांचं पक्षात बरंच काही चालतं. प्रफुल्ल पटेल यांचंदेखील पक्षात चालते, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.