Maharashtra Breaking News LIVE: आघाडी आहे म्हटल्यावर सगळ्या जागा...; पवारांनी कार्यकर्त्यांना दिली समज

Maharashtra Breaking News LIVE: राजकारण, समाजकारणासोबतच महाराष्ट्र आणि देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा धावता आढावा अगदी मोजक्या शब्दांमध्ये जाणून घ्या या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून...

Maharashtra Breaking News LIVE: आघाडी आहे म्हटल्यावर सगळ्या जागा...; पवारांनी कार्यकर्त्यांना दिली समज

29 Sep 2024, 08:27 वाजता

सुशीलकुमार शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त विशेष कार्यक्रम

अकलूज येथे राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, विजयसिंह मोहिते पाटील, बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत सुशीलकुमार शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त विशेष कार्यक्रम पार पडणार आहे. यावेळेस महाविकास आघाडीतील खासदारांचा सत्कार केला जाणार आहे. हा कार्यक्रम दुपारी 2 वाजता पार पडणार आहे.

29 Sep 2024, 08:25 वाजता

पुणे मेट्रोचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते ऑनलाईन माध्यमातून उद्घाटन

पंतप्रधान मोदींच्या हस्ते मेट्रोच्या शिवाजी नगर ते सिविल कोर्ट ते स्वारगेट भुयारी मार्गाचे ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन होणार आहे. यावेळी स्वारगेट ते कात्रज मार्गाचे भूमिपूजनही होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम गणेश कला क्रीडा मंच येथे होणार आहे.

29 Sep 2024, 08:25 वाजता

समरजीत घाटगेंचा आज मुंबईत मेळावा

आज दुपारी 3 वाजता शरद पवार गटाचे समारजीत घाटगे यांचा मेळावा लोअर परळ येथे पार पडणार आहे. मागच्या रविवारी मंत्री हसन मुश्रीफ यांनी मुंबईत मेळावा घेतला होता. समरजीत घाटगे आणि हसन मुश्रीफ हे एकमेकांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.