Maharashtra Breaking News LIVE: विधानपरिषदेच्या नवनिर्वाचित आमदारांचा 28 जुलै रोजी शपथविधी होणार

Maharashtra Breaking News LIVE: मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स

Maharashtra Breaking News LIVE: विधानपरिषदेच्या नवनिर्वाचित आमदारांचा 28 जुलै रोजी शपथविधी होणार

Maharashtra Breaking News LIVE: केंद्र सरकारने मंगळवारी अर्थसंकल्प मांडला. अर्थसंकल्पानंतर राज्यातील विरोधी पक्षाने केंद्र सरकारवर टीका केली आहे. त्याचबरोबर, मराठा आरक्षणाचा मुद्दादेखील तापला आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. राज्यातील पावसाचे अपडेट ते विविध घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स जाणून घेऊया एका क्लिकवर 

24 Jul 2024, 22:46 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: कारगिल युद्धातील शहीद सैनिकांना मुख्यमंत्री देणार मानवंदना

कारगिल युद्धातील शहीद सैनिकांना मुख्यमंत्री देणार मानवंदना. कारगिल युद्धातील सैनिकांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान होणार. 26 जुलै रोजी शिवसेना सैनिक सेलच्या वतीने साजरा होणार कारगिल विजय दिवस. मुंबई महानगरपालिकेच्या समोरील शहीद स्मारकात कारगिल सैनिकांना मानवंदना दिली जाणार.

24 Jul 2024, 20:30 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र लिहिलं आहे. मतदार यादीतील त्रुटींवर फडणवीसांनी बोट ठेवलं आहे. विधानसभा निवडणूक पूर्वी त्रुटी दूर करण्यासाची केली मागणी

24 Jul 2024, 19:01 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: रायगड जिल्‍हयात एस टी चालकाची स्‍टंटबाजी, चालकाचा प्रवाशांच्‍या जीवाशी खेळ

पूलावरून पाणी वहात असताना एस टी चालकाने बस चालवली. ही आज सकाळची घटना आहे. पालीहून घोडगाव मार्गे पेणकडे बस निघाली होती. अंबा नदी पूलावर पाणी असताना प्रवाशांचा जीव धोक्‍यात घालून प्रवास केला. भेरव गावाजवळच्या पुलावरून धोकादायक वाहतूक करण्यात आलीय. प्रवाशांच्‍या जीवाशी खेळणारा चालक निलंबित होणार असल्याची माहिती आहे. पेण आगाराचा चालक यू. एम. बनसोडे यांच्‍यावर निलंबनाची कारवाई करण्‍याचे आदेश देण्यात आले आहेत.

24 Jul 2024, 18:05 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: विधानपरिषदेच्या नवनिर्वाचित आमदारांचा 28 जुलै रोजी शपथविधी होणार

विधानपरिषदेच्या नवनिर्वाचित आमदारांचा 28 जुलै रोजी शपथविधी होणार आहे. यावेळी एकूण 11 विधानपरिषदेचे आमदार घेणार शपथविधी होणार आहे

24 Jul 2024, 17:35 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देवगिरीवर अजित पवार यांच्या भेटीला

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देवगिरीवर अजित पवार यांच्या भेटीसाठी गेले आहेत. वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी गेलेत असं कळतंय. अजित पवार काल रात्री दिल्लीमध्ये अमित शहा यांची भेट घेतली होती त्यानंतर आता फडणवीस हे पवार यांची भेट घेणार आहेत

24 Jul 2024, 16:39 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: देशाची तिजोरी महाराष्ट्र भरी आणि महाराष्ट्राच्या मात्र हातावर तुरी, रोहित पवार यांची सत्ताधाऱ्यावर टीका

काल मंत्रिमंडळ बैठकीत निधी नसल्याने मंत्र्यांमध्ये वादावादी होत असताना अर्थमंत्र्यांनी उद्विग्न होऊन जमिनी विकून निधी देऊ का, असं वक्तव्य केल्याचं समोर आलं. देशाला सर्वाधिक टॅक्स देणाऱ्या महाराष्ट्रात अशी परिस्थिती का उद्भवली?

केंद्राकडे सर्वाधिक टॅक्स महाराष्ट्र देतो, पण केंद्राकडून महाराष्ट्राच्या वाट्याला मात्र काहीच येत नाही. त्यामुळंच आज महाराष्ट्राची अवस्था दयनीय झालीय. कालचं बजेट बघता ‘देशाची तिजोरी महाराष्ट्र भरी आणि महाराष्ट्राच्या मात्र हातावर तुरी’ असं म्हणायची आज वेळ आलीय.
असो! सत्तेसाठी दिल्लीसमोर लाचारी करणं, हाच सत्ताधाऱ्यांचा राजधर्म असावा !

24 Jul 2024, 16:33 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मुंबई दौ-यावर

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मुंबई दौ-यावर येत आहेत. 29 जुलै रोजी राष्ट्रपती मुर्मू मुंबई दौ-यावर आहेत. विधानभवनात पुरस्कार वितरण कार्यक्रम, द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होणार आहे. 

24 Jul 2024, 15:13 वाजता

Maharashtra Breaking News LIVE:सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदेंचा सरकारवर गंभीर आरोप

Maharashtra Breaking News LIVE: मनोज जरांगेंनी आंदोलन स्थगित केलं असलं तरी आरक्षणाचा मुद्दा थेट लोकसभेच्या सभागृहात उपस्थित करण्यात आला...सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी मराठा आणि धनगर आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करत सरकारवर गंभीर आरोप केलेत...गेल्या अनेक वर्षांपासून सरकार खासगीकरण करून आरक्षण संपवण्याचं षडयंत्र रचत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला...महाराष्ट्रात सध्या मराठा आणि धनगर आरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेत, तिथे जरांगे उपोषणाला बसलेत असंही त्यांनी सभागृहात सांगितलं...सभागृहात पहिल्यांदाच जरांगेंच्या आंदोलनाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला...

24 Jul 2024, 13:56 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: कृष्णा नदीची पाणी पोहोचली 30 फुटांवर, तर वारणा नदीला पूरस्थिती

लोणावळा आणि परिसरात तुफान पाऊस बरसतोय, ढगफुटी सदृश्य पावसाने सखल भागात पाणी साचलं आहे. याच पाण्यामुळं मळवली भागातील बंगल्यात 20 ते 22 पर्यटक अडकले होते. पैकी 15 पर्यटकांना बाहेर काढण्यात शिवदुर्ग रेस्क्यू टीमला यश आलं आहे. उर्वरित पर्यटकांना ही काही वेळातच बाहेर काढण्यात येईल.

24 Jul 2024, 13:07 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: लोणावळ्यातील बंगल्यात अडकलेल्या 15 पर्यटकांना रेस्क्यू करण्यात यश

लोणावळा आणि परिसरात तुफान पाऊस बरसतोय, ढगफुटी सदृश्य पावसाने सखल भागात पाणी साचलं आहे. याच पाण्यामुळं मळवली भागातील बंगल्यात 20 ते 22 पर्यटक अडकले होते. पैकी 15 पर्यटकांना बाहेर काढण्यात शिवदुर्ग रेस्क्यू टीमला यश आलं आहे. उर्वरित पर्यटकांना ही काही वेळातच बाहेर काढण्यात येईल.