Maharashtra Breaking News LIVE: विधानपरिषदेच्या नवनिर्वाचित आमदारांचा 28 जुलै रोजी शपथविधी होणार

Maharashtra Breaking News LIVE: मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स

Maharashtra Breaking News LIVE: विधानपरिषदेच्या नवनिर्वाचित आमदारांचा 28 जुलै रोजी शपथविधी होणार

Maharashtra Breaking News LIVE: केंद्र सरकारने मंगळवारी अर्थसंकल्प मांडला. अर्थसंकल्पानंतर राज्यातील विरोधी पक्षाने केंद्र सरकारवर टीका केली आहे. त्याचबरोबर, मराठा आरक्षणाचा मुद्दादेखील तापला आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. राज्यातील पावसाचे अपडेट ते विविध घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स जाणून घेऊया एका क्लिकवर 

24 Jul 2024, 09:12 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: वारणा आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ कायम

सांगली जिल्ह्यातल्या कृष्णा आणि वारणा नदी पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार कायम आहे. त्यामुळे कृष्णाने वारणा नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे.चांदोली धारणातुन सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे वारणा नदीला पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक बंधारे व पूल पाण्याखाली गेले आहेत,त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याचा जवळचा संपर्क तुटला आहे.

24 Jul 2024, 09:11 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: रेड अलर्टनंतर सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस

सातारा शहरासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळतो आहे.सातारा जिल्ह्याला आज देखील रेड अलर्ट देण्यात आला आहे.जिल्ह्यातील धरण क्षेत्रात देखील जोरदार पाऊस पडतो आहे.यामुळे धरणांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होते आहे.जिल्ह्यातील सर्व धरणे 50 ते 60 टक्क्यांच्या वर भरली आहेत.

24 Jul 2024, 09:07 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: भंडारा जिल्ह्यात पूरस्थिती; महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्याच्या संपर्क तुटला

महाराष्ट्र मध्यप्रदेश राज्याच्या सिमावर्ती भागात दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरु आहे. त्यामुळे बावनथडी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. तर महाराष्ट्र- मध्यप्रदेशला जोडणाऱ्या आंतरराज्यीय मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. बावनथडी नदीच्या बपेरा पुलावर 4 ते 5 फूट पुराचे पाणी वाहत आहे.

24 Jul 2024, 09:05 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: मुंबईत आज यलो अलर्ट; ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने वाहणार वारे

मुंबईत आज हवामान खात्याने यलो अलर्ट दिला आहे. मुंबईत ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने वाहणार वारे असून दुपारी 2: 11वा भरतीची वेळ 4.72 मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. 

24 Jul 2024, 08:24 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: राज्यात महिनाभरात हिवतापाचे तीन हजार, तर डेंग्यूचे दोन हजार रुग्ण

गेले काही दिवस सतत कोसळणाऱ्या पावसामुळे राज्यात हिवताप आणि डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होऊ लागली आहे. राज्यामध्ये महिनाभरात हिवतापाचे दोन हजार ९२४ रुग्ण सापडले असून हिवतापाच्या रुग्णांची संख्या ७ हजार ४४७ वर पोहोचली आहे.

24 Jul 2024, 08:23 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; माटुंगा येथे तांत्रिक बिघाड

मध्य रेल्वेची वाहतूक आज पुन्हा विस्कळीत झाली आहे. माटुंगा येथे जलद मार्गावर बांधकामाचे साहित्य कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. सीएसएमटीकडे येणाऱ्या ट्रॅकवर सकाळी ही घटना घडली आहे. लवकरच लोकल सेवा पुरवत होईल रेल्वे प्रशासनाची माहिती.

24 Jul 2024, 08:03 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: लोणावळ्यात सर्वाधिक पावसाची नोंद, 24 तासात 275 मिमी पाऊस

लोणावळ्यात यावर्षीच्या सर्वाधिक पावसाचे नोंद आज झाली आहे. मागील 24 तासात लोणावळ्यात तब्बल 275 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जून महिन्यापासून लोणावळ्यात पावसाला सुरुवात झाली. या दीड महिन्यामधील मंगळवारी झालेला पाऊस हा सर्वाधिक पाऊस ठरला आहे. मागील आठवड्यापासून लोणावळा शहरामध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. सलग आठ दिवस शहरात पावसाचा जोर कायम आहे.

24 Jul 2024, 07:50 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: शिराळा तालुक्यातील चांदोली धरण परिसरात भूकंपाचा धक्का

शिराळा तालुक्यातील चांदोली धरण परिसरात भूकंपाचा धक्का. 3.0 रिशटर स्केल भूकंपाचा सौम्य धक्का.वारणावती सह परिसरात पहाटे 4  वाजून 47 मिनिटांवर जाणवला भूकंपाचा धक्का.वारणवती पासून 8 किलोमीटर अंतरावर भूकंपाचे केंद्रबिंदू .

24 Jul 2024, 07:03 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: पंचगंगा नदीची धोका पातळीकडे वाटचाल सुरू, राधानगरी धरण 90 टक्के भरले

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे सर्वच नद्यांची पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यातच जिल्ह्यातील धरण देखील पूर्ण क्षमतेने भरू लागली आहेत. राधानगरी धरण सध्या 90 टक्के भरले असून कोणत्याही क्षणी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडून नदी पात्रात पाण्याचा विसर्ग होऊ शकतो.

24 Jul 2024, 07:02 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: मनोज जरांगेंच्या उपोषणचा आज पाचवा दिवस; प्रकृती खालावली

मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आजचा 5 वा दिवस असून त्यांची प्रकृती खालावली आहे.गेल्या 5 दिवसांत जरांगे यांनी डॉक्टरांना तपासणी करू दिली मात्र उपचार आणि पाणी घेतलेलं नाही.त्यामुळे त्यांची प्रकृती आणखीनच खालावली आहे.