Maharashtra Breaking News LIVE: विधानपरिषदेच्या नवनिर्वाचित आमदारांचा 28 जुलै रोजी शपथविधी होणार

Maharashtra Breaking News LIVE: मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स

Maharashtra Breaking News LIVE: विधानपरिषदेच्या नवनिर्वाचित आमदारांचा 28 जुलै रोजी शपथविधी होणार

Maharashtra Breaking News LIVE: केंद्र सरकारने मंगळवारी अर्थसंकल्प मांडला. अर्थसंकल्पानंतर राज्यातील विरोधी पक्षाने केंद्र सरकारवर टीका केली आहे. त्याचबरोबर, मराठा आरक्षणाचा मुद्दादेखील तापला आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. राज्यातील पावसाचे अपडेट ते विविध घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स जाणून घेऊया एका क्लिकवर 

24 Jul 2024, 12:58 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: भारतीय जनता पक्षाचे शिष्टमंडळ आज केंद्रीय निवडणूक आयोगाची भेट घेणार

विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने मतदार यादात सुधारणा करण्याची मागणी भाजपचे शिष्टमंडळ करणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी मतदार यादीत अनेक नावे गहाळ झाली होती व त्याचा भाजपला फटका बसला होता

24 Jul 2024, 12:17 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: मराठा समाजाच्यावतीने लातूर - सोलापूर महामार्ग अडवला

मराठा समाजाला आरक्षण द्यावे आणि मनोज जरंगे पाटील यांच्या सुरू असलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मराठा समाज भर पावसात एकवटला आहे. मराठा समाजाच्या वतीने लातूर - सोलापूर महामार्ग अडवण्यात आला आहे. 

24 Jul 2024, 12:13 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: पुण्याच्या सिंहगडावरील दगडी भिंत कोसळली

सिंहगडावरील देवटाक्याची भिंत पावसामुळं कोसळली आहे. मागील दोन दिवसांपासून डोंगर माथ्यावर जोरदार पाऊस सुरू आहे. याचाच फटका सिंहगडाला बसला आहे. सिंहगड घाटात ही दरडी कोसळल्याने मलबा बाजूला केला जात आहे.

24 Jul 2024, 10:32 वाजता

Maharashtra Breaking News LIVE:  मुसळधार पावसानं कल्याणमधील रस्ते जलमय

गेल्या अर्धा तासापासून कल्याण शहरांमध्ये पावसाची संततधार सुरू आहे. या पावसामुळे कल्याण मधील रस्ते जलमय झालेत. कल्याणच्या मलंगड भागात जाणाऱ्या चेतना परिसरातील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले आहे.

24 Jul 2024, 10:31 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: फडणवीसांच्या भेटीआधी अजितदादांनी घेतली शहांची भेट

भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीपूर्वी राजधानी दिल्लीत उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी घेतली अमित शहा यांची भेट घेतली आहे. त्यामुळं राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

24 Jul 2024, 10:23 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: फडणवीसांच्या भेटीआधी अजितदादांनी घेतली शहांची भेट

 

24 Jul 2024, 10:22 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: वाशिमच्या मालेगाव तालुक्यात जोरदार झालेल्या पावसामुळे काटेपूर्णा नदी वाहतेय दुथडी भरून

वाशिम जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाची रिपरीप आहे.पावसामुळे पाणी पातळीत वाढ झाली आहे.मालेगाव तालुक्यातील झालेल्या जोरदार पावसामुळे काटेपूर्णा धरणक्षेत्रात पाणीसाठा वाढल्याने पाण्याची चिंता मिटली असून जून महिन्यात कोरडी ठक झालेली काटेपूर्णा नदी आज दुधडी भरून वाहत आहे.

24 Jul 2024, 09:38 वाजता

Maharashtra Breaking News LIVE:  नाळा तलावात बुडून 37 वर्षीय इसमाचा मृत्यू

नालासोपारा पश्चिम नाळा गावातील तलावात एका तरुणाचा पाण्यात बूडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.कौशीक प्रमोद राऊत (वय ३७) असे या तरुणाचे नाव आहे

24 Jul 2024, 09:29 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: मनोज जरांगे उपोषण स्थगित करणार; 13 ऑगस्टपर्यंत सरकारला वेळ देणार 

हे सलाईन म्हणजे जेवण केल्यासारखे आहे. त्यापेक्षा नाही उपोषण केलं तरी चालत या मताचा मी आहे. हे सलाईन लावत राहणार आहे त्यापेक्षा मी मग दुपारी उपोषण स्थगित करून दौरे सुरू करीन महिलांच्या हाताने उपोषण स्थगित करीन असं उपोषण करून काहीही फायदा नाही, असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

24 Jul 2024, 09:14 वाजता

Maharashtra Breaking News LIVE: मनोज जरांगे उपोषण स्थगित करणार; 13 ऑगस्टपर्यंत सरकारला वेळ देणार