Maharashtra Breaking News Today LIVE Updates : उलटी,जुलाब लागल्याने 2 वर्षाच्या आदिवासी मुलीचा मृत्यू

महाराष्ट्रातील घडामोडींचा वेगवान आढावा फक्त एका क्लिक वर. 

Maharashtra Breaking News Today LIVE Updates : उलटी,जुलाब लागल्याने 2 वर्षाच्या आदिवासी मुलीचा मृत्यू

राज्य विधीमंडळाचं आजपासून मुंबईत विशेष अधिवेशन असणार आहे. आजपासून 3 दिवसांचं विशेष अधिवेशन असणार आहे. 7, 8 डिसेंबरला नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी असणार आहे. सकाळी 11 वाजता विशेष अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. 9 डिसेंबरला विधानसभा अध्यक्षांची निवड होणार आहे. 9 डिसेंबरला संध्याकाळी 4 वाजता दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत राज्यपालांचं अभिभाषण असणार आहे. त्यानंतर 9 डिसेंबरलाच नागपूरमध्ये होणा-या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची घोषणा केली जाईल. 

7 Dec 2024, 10:52 वाजता

नवनिर्वाचित आमदारांच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वाहिली मानवंदना

थोड्याच वेळात विशेष अधिवेशनाला सुरुवात

7 Dec 2024, 10:29 वाजता

राज ठाकरे भाजपच्या हातचं खेळणं 

माझ्यावरही भाजपनं दबाव टाकला असं संजय राऊत म्हणाले. भाजपमध्ये जा आणि आपल्यावरची कारवाई दूर करा, अशी ऑफर संजय राऊत यांना दिली होती. राज ठाकरे हे भाजपच्या हातचं खेळणं असल्याचं संजय राऊत म्हणाले. मुंबईत मराठी माणसांवर अन्याय होत आहे. 

7 Dec 2024, 10:24 वाजता

भाजपला शरण न जाणाऱ्यांची संपत्ती जप्त - संजय राऊत 

संजय राऊत यांनी अजित पवार आणि पार्थ पवार यांचं अभिनंदन केलं आहे. भाजपला शरण न जाणाऱ्यांची संपत्ती जप्त केली मात्र अजित पवारांची संपत्ती मात्र मुक्त केली आहे. यापुढे संजय पवार म्हणाले की, ईडीनं इतकांची देखील संपूत्ती मुक्त करावी. 

7 Dec 2024, 10:14 वाजता

खातं मागणं हे काही चूकीचं नाही - उदय सामंत

- २ दिवसांत खातेवाटप पूर्ण होऊन मंत्रीमंडळाचा शपथविधीही पार पडेल 
- खातं मागणं हे काही चूकीचं नाही, सकारात्मक निर्णय होईल 
- मंत्रीमंडळ विस्ताराबाबत महायुतीचे ३ वरिष्ठ नेते निर्णय घेतील 
- २४ तास एकनाथ शिंदेंनी काय हसतच रहावं का?त्यांचा चेहरा आहे तसाच आहे.. ते नाराज वगैरे काही नाही

7 Dec 2024, 09:59 वाजता

शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार अमोल धोंडिबा यांनी विधानसभेच्या पायरीच्या पाया पडून प्रवेश केला. 

7 Dec 2024, 09:50 वाजता

विधानसभेच्या पहिल्या पायरीचं दर्शन घेतं राजेश मोरेंनी केला प्रवेश 

मनसेचे एकमेव आमदार यांना पराभूत करुन राजेश मोरे कल्याण ग्रामीणचे आमदार झाले आहेत. कल्याण ग्रामीणचा विकास करणार असल्याचं राजेश मोरे यांनी सांगितलं. पहिल्यांदाच विधानसभेत येत असल्यामुळे पहिल्या पायरीचं दर्शन घेत प्रवेश केला. 

7 Dec 2024, 09:48 वाजता

शरद पवार गटाला मोठा धक्का

जळगावमधील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते गुलाबराव देवकर राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. गुलाबरावांनी देवकरांनी मुंबईत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंची भेट घेतलीय. या भेटीत पक्षप्रवेशनाबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळतेय. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांआधी जळगाव मध्ये शरद पवार गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. दरम्यान जळगाव ग्रामीण मतदारसंघात गुलाबराव देवकर यांचा शिवसेना नेते गुलाबराव पाटलांकडून पराभव झाला होता.

7 Dec 2024, 09:44 वाजता

कोणत्या मंत्र्यांच्या नावे कोणता बंगला?

हिवाळी अधिवेशनासाठी बंगल्यांचं वाटप होणार आहे. कॅबिनेटमध्ये एकनाथ शिंदे दुस-या क्रमांकावर आहे. शिंदेंना नागपुरातील देवगिरी बंगला देण्यात आलाय तर अजितदादांचा विजयगड बंगल्यावर मुक्काम असेल. 

7 Dec 2024, 08:43 वाजता

जर तुम्ही मोबाईल खिशात ठेवून फिरत असाल तर ही बातमी महत्त्वाची आहे. खिशात ठेवलेल्या मोबाईलच्या स्फोट होऊन एका मुख्याध्यापकाचा मृत्यू झाला आहे. तर एक गंभीर जखमी झाला आहे. भंडारा जिल्ह्यातील सिरेगाव टोला इथं ही घटना घडली आहे.  सुरेश संग्रामे असं मृत मुख्याध्यापकाचं नाव आहे. ते नत्थु गायकवाड यांच्यासोबत दुचाकीवरुन जात असताना अचानक त्यांच्या मोबाईलचा स्फोट झाला. त्यानंतर त्यांच्या कपड्याला आग लागली असून ते यामध्ये भाजले गेले. दरम्यान त्याचा मृत्यू झाला.. तर त्यांचा मित्र नत्थु गायकवाड हा देखील गंभीर जखमी झाला आहे. 

7 Dec 2024, 08:39 वाजता

अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिकांवर रोगराईचं संकट.. औषध खरेदीसाठी शेतक-यांची गर्दी... महागड्या औषधांमुळे शेतकरी आर्थिक संकटात