Maharashtra Breaking News Today LIVE Updates : उलटी,जुलाब लागल्याने 2 वर्षाच्या आदिवासी मुलीचा मृत्यू

महाराष्ट्रातील घडामोडींचा वेगवान आढावा फक्त एका क्लिक वर. 

Maharashtra Breaking News Today LIVE Updates : उलटी,जुलाब लागल्याने 2 वर्षाच्या आदिवासी मुलीचा मृत्यू

राज्य विधीमंडळाचं आजपासून मुंबईत विशेष अधिवेशन असणार आहे. आजपासून 3 दिवसांचं विशेष अधिवेशन असणार आहे. 7, 8 डिसेंबरला नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी असणार आहे. सकाळी 11 वाजता विशेष अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. 9 डिसेंबरला विधानसभा अध्यक्षांची निवड होणार आहे. 9 डिसेंबरला संध्याकाळी 4 वाजता दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत राज्यपालांचं अभिभाषण असणार आहे. त्यानंतर 9 डिसेंबरलाच नागपूरमध्ये होणा-या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची घोषणा केली जाईल. 

7 Dec 2024, 14:19 वाजता

उद्या महाविकास आघाडीचे सर्व नवनिर्वाचित आमदार शपथ घेणार 

महाविकास आघाडीच्या नवनिर्माची आमदारांनी आज शपथ न घेण्याचं जाहीर केले होते. त्यानंतर विधिमंडळातून आदित्य ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, भास्कर जाधव, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जितेंद्र आव्हाड हे मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी गेले होते. उद्धव ठाकरे यांच्याशी अर्धा तास चर्चा केली. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचा फोनवर बोलणं झालं आणि उद्या महाविकास आघाडीचे सर्व नवनिर्वाचित आमदार शपथ घेतील असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटल आहे.

7 Dec 2024, 14:06 वाजता

बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, मी राजीनामा द्यायला तयार- सुनिल राऊत 

बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, मी लगेच राजीनामा द्यायला तयार आहे, असे आमदार सुनिल राऊत म्हणाले. बॅलेट पेपरवर निवडणूक झाल्यास मी 50 ते 60 हजार मतांनी मी निवडून येईन, असेही ते म्हणाले.

7 Dec 2024, 13:15 वाजता

मधुकरराव पिचड यांच्या अंत्यविधीला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उपस्थित राहण्याची शक्यता

जेष्ठ नेते मधुकरराव पिचड यांच्यावर अकोले तालुक्यातील राजूर गावात अंत्यसंस्कार होणार असून तत्पूर्वी अकोले महाविद्यालयात अंत्यदर्शनासाठी मोठा जनसागर उसळला आहे... एकीकडे आज नवनिर्वाचित आमदार शपथ घेत असताना अकोले येथील राष्ट्रवादीचे आमदार तथा पिचड यांचे राजकीय विरोधक किरण लहामटे मात्र अंत्यसंस्कारासाठी अकोलेतच थांबले आहेत.. राधाकृष्ण विखे पाटील हे देखील आज ऐवजी उद्या शपथ घेणार आहेत.. राजूर गावात दोन हेलिपॅड बनवण्यात आल्याने चार वाजता पिचडांच्या अंतिम दर्शनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्यातील काही महत्त्वाचे नेते उपस्थित रहातील अशी दाट शक्यता आहे.

7 Dec 2024, 12:13 वाजता

आदित्य ठाकरेंचा महायुतीला सवाल?

महायुतीला दिलेलं बहुमत कुणाचं आहे - आदित्य ठाकरे
आमच्या मनातील शंका EVM वर आहे
आज आमदारकीची शपथ घेणार नाही?
विशेष अधिवेशनादरम्यान विरोधकांचा सभात्याग
शपथ न घेताच विरोधी पक्षाचे आमदार सभागृहाबाहेर 

 

7 Dec 2024, 11:33 वाजता

महायुतीतील आम्ही सर्वजण पहिल्या दिवसापासून अगदी मनापासून उत्तम पद्धतीनं काम करु - अजित पवार

माध्यमांशी संवाद साधताना महायुतीतील आम्ही सर्वजण पहिल्या दिवसापासून अगदी मनापासून उत्तम पद्धतीनं काम करण्याचा निश्चय केला असल्याच उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत. तसेच पुढे त्यांनी सांगितले की, हे सर्व करताना सर्व जातीधर्मांना आम्हाला कसा न्याय देता येईल आणि शिव-शाहू-फुले- आंबेडकरांची विचारधारा जे सांगते ती विचारधारा पुढे नेत असताना केंद्राची, मोदी साहेबांची मोठ्या प्रमाणावर मदत महाराष्ट्राला मिळवण्याकरता प्रयत्नशील राहू. तसेच मोठे प्रकल्प मार्गी लावण्याकरता जे कार्यक्रम असतील ते वेळेत पूर्ण करण्याचा आमचा कटाक्षानं प्रयत्न असेल, अशी माहिती अजित पवारांनी दिली आहे. 

7 Dec 2024, 11:28 वाजता

राऊतांचा राज ठाकरेंना ठाकरे शैलीत टोला! म्हणाले, 'फडणवीस पत्ते पिसत बसले असतील तर...'

Devendra Fadnavis Raj Thackeray: देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंसंदर्भातील सूचक विधान केल्याचा संदर्भ देत संजय राऊत यांना विचारण्यात आला असता त्यांनी कठोर शब्दांमध्ये निशाणा साधला. 'देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील' असा विश्वास विधानसभा निवडणुकीच्या मतदानाआधीच व्यक्त करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. 

सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा. 

7 Dec 2024, 11:16 वाजता

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आमदारकीची शपथ 

7 Dec 2024, 11:04 वाजता

विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात 

मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री विधानभवनात दाखल
9 डिसेंबरला विधानसभा अध्यक्षांची निवड
आज आणि उद्या नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी 

7 Dec 2024, 11:00 वाजता

नवनिर्वाचित आमदारांनी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करुन कामकाजाला केली सुरुवात

7 Dec 2024, 10:59 वाजता

फडणवीस ठाकरेंची विधानसभेच्या पायरीवरच भेट 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांची विधानसभेच्या पायरीवरच भेट झाली. यावेळी आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांचे हंस्तादोलन करुन अभिनंदन केले.